पुणे ः वाफसा नसल्याने रब्बीला धीम्या गतीने सुरुवात

Rabbi began to slow down due to over steam
Rabbi began to slow down due to over steam

पुणे ः ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिपावसामुळे अजूनही जमिनीत ओलाव्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाफसा नसल्याने अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या असल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, दौंड, बारामती, इंदापूर, मावळ, मुळशी, भोर व वेल्हा या तालुक्यांत धीम्या गतीने पेरण्या सुरू असून, सरासरीच्या तीन लाख ९१ हजार ८९७ हेक्टरपैकी एक लाख ३० हजार ७६४ हेक्टर म्हणजेच ३३ टक्के पेरण्या झाल्या असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  

सध्या पुणे जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील भात पिकाची कापणी वेगात सुरू आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे पुरंदर, भोर, मावळ, मुळशी, भोर, जुन्नर, आंबेगाव, खेड व हवेली या तालुक्यांतील अनेक गावांत भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भुईमूग पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली असून पावसामुळे भोर, शिरूर, दौंड, पुरंदर तालुक्यात पिकांचे नुकसान झाले आहे. मका पीक काढणीच्या अवस्थेत आहे. 

अवकाळी पावसामुळे इंदापूर तालुक्यात मका पिकांचे नुकसान झाले आहे. तूर पीक शेंगा येण्याच्या अवस्थेत आहे. इंदापूरमध्ये तुरीचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस पिकांची शिरूर, बारामती, इंदापूर व दौंड तालुक्यांत वेचणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी रब्बीची कामे खोळंबली असून, पेरण्या लांबणार असल्याची स्थिती आहे. 

यंदा मॉन्सूनोत्तर पावसामुळे जमिनीत ओलाव्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रब्बीच्या पेरण्या उशिराने सुरू असल्या तरी क्षेत्रात जवळपास ५० ते ६० हजार हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार कृषी विभागाने नियोजन केले असून खते, बियाण्यांचे वाटपही करण्यात आले आहे.

पीकनिहाय झालेली रब्बीची पेरणी, क्षेत्र, हेक्टरमध्ये 
पीक सरासरी  पेरणी झालेले   टक्के
रब्बी ज्वारी   २,४६,९२४   १,१३,७१३   ४६
गहू   ६३,८५४   २,२२२   ३
मका   १८,८१०   ६५७५   ३५
इतर तृणधान्य   ४८१   १८३   ३७
हरभरा   ५८,४२६   ४,८१८   ८
इतर कडधान्य   २,५१९   ३,०२४   १२०
करडई   ३२८ 
तीळ    ६०   ८   १३
सूर्यफूल   २६१   २१९   ८४
इतर गळीत धान्य   २३४   २   १

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com