प्रतिबंधात्मक उपायांनी रोखा कोंबड्यातील मानमोडी आजार

मानमोडी आजारावर रोगप्रतिबंधक लसीकरण हाच चांगला उपाय आहे.
मानमोडी आजारावर रोगप्रतिबंधक लसीकरण हाच चांगला उपाय आहे.

कोंबड्यांमध्ये मानमोडी या आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणात मरतूक होते. ज्या कोंबड्या या आजारातून बऱ्या होतात, त्या अंडी देणे बंद करतात. सफल अंड्याचे प्रमाण कमी होते. या आजाराचा प्रादुर्भाव माणसांना देखील होतो आणि कंजंक्‍टायव्हिटिस (डोळे येणे) हा आजार होतो. मानमोडी या आजारावर रोगप्रतिबंधक लसीकरण हाच चांगला उपाय आहे.

कोंबड्यांमधील मानमोडी या आजाराला रानीखेत किंवा न्यू कॅसल डिसीजदेखील म्हणतात. हा आजार अतिशय संसर्गजन्य असून, सर्व भागात आढळतो. हा आजार प्रथम इंग्लंडमध्ये न्यू कॅसल येथे १९२७ मध्ये आढळला, तर भारतात उत्तर प्रदेशातील रानीखेत या डोंगराळ भागात १९२८ मध्ये आढळून आला. 

कारणे 

  • हा रोग लॅटोजेनिक, मेसोजेनिक आणि व्हेलोजेनिक विषाणूपासून होतो. विषाणू कोंबड्यांच्या वेगवेगळ्या अवयवांवर परिणाम करतात. 
  • पचनसंस्था, यकृत, श्‍वसनेंद्रिये, आणि मज्जासंस्थेवर दिसून येणाऱ्या लक्षणावरून या आजाराचे विषाणू विभागलेले आहेत. 
  • लेंटोजेनिक विषाणुमुळे कोंबड्यांना श्‍वास घताना त्रास होतो. उंडी उत्पादनात घट येते. 
  • मेसोजेनिक विषाणूमुळे कोंबड्यांना हिरवी हगवण लागते. पंख, पाय लुळे पडतात. मान वाकडी होते. 
  • व्हेलोजेनिक विषाणुमुळे कोंबड्यांना श्‍वासोच्छवास अत्यंत त्रास होतो. रक्ताची हगवण लागते. 
  • प्रसार 

  • या आजाराचा प्रसार हवेच्या माध्यमातून होतो. आजारी कोंबड्यांच्या विष्ठेवाटे, श्वासावाटे या आजाराचे विषाणू वातावरणात मिसळतात. त्यामुळे शेडमधील वातावरण दूषित होते. त्याचप्रमाणे शेडमधील खाद्यभांडी पाण्याची भांडीदेखील दूषित होतात. 
  • शेडमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कपडे, बूट इत्यादी दूषित होऊन रोगाजाराचा प्रसार होतो. 
  • आजारी कोंबड्यांच्या विष्ठेद्वारे शरीराबाहेर पडलेले रोगकारक विषाणू वातावरणात ६ महिने राहतात. 
  • आजाराने मृत्यू पावलेल्या कोंबड्यांची योग्य व्हिलेवाट न लावल्यामुळे त्यापासून आजाराचा प्रसार होतो. 
  • मांजर, कुत्रे, कामगार हे एका फार्मवरून दुसऱ्या फार्मवर आजाराचा प्रसार करतात. 
  • लहान पिलांतील लक्षणे 

  • आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास पिले ठसकतात, नाकातून पाणी येते. 
  • चोच उघडी ठेवून श्वास घेतात, श्वास घेताना आवाज होतो. 
  • कोंबड्या सुस्त राहतात, एका ठिकाणी कोपऱ्यात गर्दी करून उभ्या राहतात. 
  • पांढरी पाण्यासारखी विष्ठा आढळून येते. 
  • विषाणूचा प्रादुर्भाव मज्जासंस्थेवर झाल्यास कोंबड्यांना चालता येत नाही. थरथर कापतात. काही वेळा लंगडतात. 
  • मोठ्या कोंबड्यातील लक्षणे 

  • श्वास घेताना त्रास होतो, आवाज येतो. 
  • कळपातील कोंबड्या एकाऐकी आजारी पडतात. 
  • कोंबड्यांना पाण्यासारखी संडास होते. 
  • विष्ठेचा रंग हिरवट व खडूसारखा असतो. 
  • अंडी देण्याचे प्रमाण एकदम कमी होते. 
  • अंड्याचे कवच मऊ होते, आकार बदलतो. 
  • अंड्यातील पांढरा बलक पाण्यासारखा पातळ होतो. 
  • निदान 

  • लहान आणि मोठ्या कोंबड्यांतील लक्षणावरून मरणोत्तर तपासणी 
  • प्रोव्हेट्रिक्‍सलस रक्ताचे ठिपके दिसून येतात. 
  • फुप्फुसामध्ये रक्त जमा झालेले आढळून येते. 
  • गिझार्ड रक्त जमा झालेले आढळून येते. त्याचप्रमाणे जखमा किंवा फोड आलेले आढून येतात. 
  • डोळ्यांच्या आतील कातडीवर रक्त जमा झालेले दिसून येते. 
  • उपचार 

    या आजारावर कोणतेही खात्रीलायक उपाचार नाहीत. आजार होऊ नये म्हणून पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली अँटिबायोटिक्‍सचा वापर करावा. 

    लसीकरण  

  • लासोटा लस ५ ते ७ दिवस वयाच्या पिलांना नाकात १ थेंब टाकून द्यावी.
  • मुलेश्वर किंवा आरटूबी लस वयाच्या साठाव्या आठवड्यात इंजेक्‍शनद्वारे पंखामधून द्यावी. 
  •  प्रतिबंधात्मक उपाय 

  • शेडमध्ये स्वच्छता राखावी. 
  • आजाराने मेलेल्या कोंबड्या जाळून टाकाव्यात. 
  • बाहेरच्या व्यक्तींना फार्मवर प्रवेश देऊ नये. 
  • आजाराचे निदान झाल्यावर आजारी कोंबड्या वेगळ्या कराव्यात. त्यांच्या खाद्य-पाण्याची व्यवस्था वेगळी करावी. 
  • डॉ. श्रीकांत सरदेशपांडे, ९६५७२५७८०४ (सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com