नागपूर जिल्ह्यात फळपीकविमा योजनेत सहभाग वाढवा : ठाकरे

नागपूर जिल्ह्यात फळपीकविमा योजनेत सहभाग वाढवा : ठाकरे
नागपूर जिल्ह्यात फळपीकविमा योजनेत सहभाग वाढवा : ठाकरे

नागपूर  ः जिल्ह्यातील काटोल, नरखेड आणि कळमेश्‍वर तालुक्यातील संत्रा व मोसंबी उत्पादकांना फळपीक योजनेत सहभागासाठी प्रवृत्त करा, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधींसोबत पुनर्रचित हवामान आधारित फळपीकविमा योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, अर्चना कोसरे, भारती ॲक्‍सा जनरल इन्शुरन्सचे डी. एल. पालवे, बजाज अलायन्सचे सागर राणे, एसबीआय जनरल इन्शुरन्सचे विशाल चौधरी, एआयसीचे पितांबर मेश्राम, एसबीआयचे विनय पारवे उपस्थित होते.  या वेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या पुनर्रचित हवामान आधारित प्रधानमंत्री फळपीकविमा योजनेत फळपीकविमा कंपन्यांकडून संत्रा आणि मोसंबीच्या आंबिया बहरासाठी हेक्‍टरी ३८५० आणि गारपिटीसाठी १२८३ असा ५ टक्‍के म्हणजे ५१३३ रुपये हप्ता भरावा लागेल. पुनर्रचित हवामान्याच्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना ७७ हजार, तर गारपिटीसाठी २५ हजार ६६७ रुपये प्रतिहेक्‍टरी मदत मिळू शकणार आहे, असे सांगितले. जिल्ह्यातील संत्रा व मोसंबी उत्पादक कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फळपीकविमा योजनेचा लाभाकरिता शनिवार (ता. ३०) पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले. आंबिया बहर २०१९-२० साठी अधिसूचित फळपिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी निर्धारित करण्यात आला आहे. या फळपीक योजनेमध्ये अवेळी पाऊस, कमी तापमान, जास्त पाऊस आणि गारपीट असे वेगवेळे प्रकार करण्यात आले आहेत. एसबीआय जनरल इन्शुरन्स विमा कंपनीकडून जिल्ह्यातील ३५३१ फळपीक उत्पादक शेतकऱ्यांनी मृग बहरासाठी विमा काढला होता. त्यापैकी २३०० शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला, असेही सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com