agrowon agri news marathi ; In Nandurbar district, the speed of sowing gram, maize in the district | Agrowon

नंदुरबार जिल्ह्यात हरभरा, मका पेरणीला वेग

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

नंदुरबार  ः जिल्ह्यात रब्बी हंगामाबाबत शेतकऱ्यांनी उभारीने कार्यवाही हाती घेतली आहे. हरभरा व कोरडवाहू ज्वारीची पेरणी अनेक भागांत सुरू आहे. येत्या आठवड्यात गव्हाची पेरणीदेखील जिल्ह्यात सुरू होईल. हरभऱ्यासह गव्हाची पेरणी जिल्ह्यात यंदा १५ ते २२ हजार हेक्‍टरने वाढण्याचा अंदाज आहे. 

नंदुरबार  ः जिल्ह्यात रब्बी हंगामाबाबत शेतकऱ्यांनी उभारीने कार्यवाही हाती घेतली आहे. हरभरा व कोरडवाहू ज्वारीची पेरणी अनेक भागांत सुरू आहे. येत्या आठवड्यात गव्हाची पेरणीदेखील जिल्ह्यात सुरू होईल. हरभऱ्यासह गव्हाची पेरणी जिल्ह्यात यंदा १५ ते २२ हजार हेक्‍टरने वाढण्याचा अंदाज आहे. 

जिल्ह्यात धडगाव व अक्कलकुवामधील अतिदुर्गम भाग, पर्वतीय क्षेत्रात रब्बी पिके अपवादाने घेतली जातात. तळोदा, नवापूर, शहादा, नंदुरबार या चार तालुक्‍यांमध्ये रब्बी असतो. जिल्ह्यात रब्बीसंबंधीचे सर्वसाधारण क्षेत्र सुमारे ८५ हजार हेक्‍टर आहे. परंतु पाऊसमान चांगले झाले आहे. नद्यांना चांगले प्रवाही पाणी आले. यामुळे यंदा जिल्ह्यात सुमारे एक लाख हेक्‍टरवर रब्बी हंगाम उभा राहील, असे संकेत आहेत. त्यात कांद्याचे क्षेत्रही यंदा सुमारे दीड हजार हेक्‍टरपर्यंत असू शकते. कांदा लागवड अजून सुरू झालेली नाही. तापी, गोमाई, सुसरी, रंगावली, खर्डी आदी नद्यांच्या काठावरील भागासह विविध प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात रब्बी जोमात राहील, असे संकेत आहेत. कोरडवाहू दादर ज्वारीसाठी शहादा तालुक्‍यातील पूर्व तापीकाठचा काही भाग प्रसिद्ध आहे.

तसेच कोरडवाहू हरभऱ्याची पेरणीदेखील तापी नदीकाठच्या भागात सुरू आहे. ही पेरणी येत्या आठ ते १० दिवसांत पूर्ण होईल. तळोदा व शहादा तालुक्‍यांत सुमारे दोन ते अडीच हजार हेक्‍टरवर काबुली हरभऱ्याची पेरणीदेखील होईल, असे संकेत आहेत. शेतकरी काबुली हरभऱ्याची पेरणी गादीवाफे व ठिबकवर करीत आहेत. या हरभऱ्याची खरेदी शिरपूर व नजीकच्या गुजरात, मध्य प्रदेशातील व्यापारी थेट गावात येऊन करतात. त्यास मागील हंगामात प्रतिक्विंटल साडेपाच ते सात हजार रुपये दर मिळाले होते. यामुळे या हरभऱ्याची पेरणीदेखील यंदा वाढू शकते. 

मका लागवडही सुरू झाली आहे. गव्हाची पेरणी अजून सुरू झालेली नसली तरी यंदा गव्हाचे क्षेत्र सुमारे पाच ते सहा हजार हेक्‍टरने वाढू शकते. यंदा १०० टक्के क्षेत्रात रब्बीची पेरणी होईल, अशी अपेक्षा कृषी विभागाला आहे. हरभऱ्यापाठोपाठ मका, गहू व दादर ज्वारीची पेरणी होईल. आतापर्यंत सुमारे ४० टक्के क्षेत्रात पेरणी पूर्ण झाल्याची माहिती मिळाली. 


इतर ताज्या घडामोडी
अंजीर-सिताफळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ...पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या ...
तोलाई मजुरीसाठी सांगली बाजार समितीच्या...सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तोलाई...
परभणी जिल्ह्यात सिंचनाची ५० कोटींवर...परभणी : जिल्ह्यातील लघू, मध्यम, मोठ्या...
खानदेशात रब्बी ज्वारी, मक्यावर लष्करी...जळगाव : खानदेशात खरिपात शेतकऱ्यांना फटका बसलेला...
परभणीत गाजर ८०० ते १५०० रुपये...परभणी  : येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत साडेआठ...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड या तीन...
अमरावती विभागात सहा लाख ८३ हजार शेतकरी...अमरावती ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
एम्प्रेस गार्डनच्या पुष्पप्रदर्शनाला...पुणे ः एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनच्या वतीने आयोजित...
अकोल्यात भारिप, वाशीममध्ये...अकोला ः जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष...
पुणे जिल्ह्यात उद्या पल्स पोलिओ लसीकरण...पुणे : पोलिओच्या आजाराचे उच्चाटन करण्याच्या...
पत्नीच्या नावे कामकाजासाठी येणाऱ्या...बुलडाणा ः स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना...
पाणी, शेती विकासासह समाजकारणाला...नगर : निवडणुकीत पराभव मी मानत नाही. लोकांचे...
पुणे जिल्ह्यात ज्वारी पिकावर चिकट्याचा...पुणे ः पुणे जिल्ह्याच्या पश्चिम जिरायत भागात...
प्रशासकीय कामकाज सेवा हमी कायद्यानुसार...अकोला ः शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत...
वीज रोहित्र ४८ तासांत बदलून द्या;...अकोला ः वीज रोहित्रांबाबत शेतकऱ्यांच्या असंख्य...
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना न्याय न...मुंबई ः केंद्र सरकारचे कृषीविषयक धोरण सातत्याने...
पुणे, मुंबई बाजार समितीच्या निवडणुका...पुणे ः उच्च न्यायालयाच्या आदेशाने सुरू असलेल्या...
फडणवीस सरकारच्या टेंडर मॅनेजमेंट...मुंबई ः काँग्रेस पक्षाने २६ ऑगस्ट २०१९ व २९ ऑगस्ट...
शेतीमाल निर्यातबंदी उठवण्यासाठी लढा...औरंगाबाद : शेतकऱ्यांना दिलेली आश्‍वासने पूर्ण...
साखर उद्योग सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील...पुणे ः साखर उद्योगाचे एक चक्र असून, या उद्योगाला...