पावसाळ्यात जनावरांना होतात हे आजार

पावसाळ्यात जनावरांना विविध आजारांची बाधा होत असते. या विविध आजारांमध्ये पोटाचे आजार, कासेचे आजार, खुरांचे आजार तसेच परजीवीमुळे होणारे आजार यांचा समावेश होत असतो.
Animal Diseases in rainy season
Animal Diseases in rainy seasonAgrowon
Published on
Agrowon

पावसाळ्यात नवीन उगवलेलं गवत जनावरांनी जास्त प्रमाणात खाल्ल्याने जनावरांना पोट्फुगीचा त्रास होतो. पोटफुगीच्या एका प्रकारात पोटात मोकळी हवा साचून राहते. दुसऱ्या प्रकारात हवेबरोबर पाणी पण साचून राहते.

Agrowon

पावसाळ्यात जनावरांचे पाय सतत चिखलात किंवा ओलसर राहिल्याने खुरे नरम पडत असतात. नरम पडलेल्या खुरांना जखम फार लवकर होते. परिणामी जनावरांना खुरांचा संसर्ग झालेला दिसून येतो.

Agrowon

पावसाळ्यात सततच्या ओलसर वातावरणामुळे जनावरांमध्ये कासेचे आजार दिसून येतात. धार काढल्यानंतर सडाचे छिद्र जवळपास ४५ मिनिटे बंद होत नाही. ओलसर ठिकाणी जनावर बसल्यास दगडीचे जीवाणू या उघड्या छिद्रातून कासेत प्रवेश करतात.

Agrowon

पावसाळ्यातील वातावरण दमट असल्याने गोचीडांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढत असते. गोचीडमुळे जनावरांना थायलेरीया, बबेशिया, अनाप्लाझमा यांसारख्या आजारांची बाधा होत असते.

Agrowon

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com