जनावरांमध्ये दिसून येणाऱ्या काळपुळी आजाराबद्दलची माहिती

फाशी या आजारास काळपुळी असेही म्हटले जाते. या आजारामध्ये काही लक्षणे दिसण्यापूर्वीच जनावरांचा तडकाफडकी मृत्यु होतो.
जनावरांमध्ये दिसून येणाऱ्या काळपुळी आजाराबद्दलची माहिती
ANTHRAX disease in animalsAgrowon
Published on
Agrowon

निरोगी जनावरांमध्ये काळपुळी आजाराच्या प्रादुर्भावामुळे अचानक मृत्यु होतो. काळपुळी हा आजार बॅसिलस अँथ्रॅसिस या जिवाणूमुळे होतो.

Agrowon

बॅसिलस अँथ्रॅसिस या जीवाणूचा प्रसार बाधित प्राण्यांचे केस, लोकर, हाडे आणि मांस यामधून होत असतो. रोगाने बाधित जनावराचा मृत्यु झाल्यानंतर हे जीवाणू बीज तयार करतात.

Agrowon

दुषित मातीच्या संपर्कातून हे जीवाणू खाण्यावाटे किंवा जखमेद्वारे जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात. हे जीवाणू शरीरात मॅक्रोफेज या पांढऱ्या रक्तपेशींमार्फत लसिका ग्रंथींमध्ये जातात.

Agrowon

साधारणपणे २ ते ३ तास आधी निरोगी दिसणाऱ्या जनावरांमध्ये अचानक मरतूक होते. फार कमी जनावरांमध्ये २४ तासांच्या आत कधी कधी थरथरणे, ताप येणे, श्वसनास त्रास होणे, जमिनीवर आडवे पडणे, झटके येणे आणि मृत्यू होणे अशी लक्षणे दिसून येतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com