बहारीनमध्ये भारतीय आंब्याची बहार

बहारीनखेरीज अल जझीरा समूहाच्या हमला, महुझ, झिंग, जुफैर, रिफा, सीफ आदी ठिकाणच्या सुपरमार्केट्समध्ये सर्व प्रकारचे भारतीय आंबे ठेवण्यात आले आहेत. विविध प्रकारच्या आंब्यांसोबतच अल जझीरा ग्रुपने त्यांच्या सर्व सुपरमार्केट्समध्ये आंब्याचे केक, ज्यूस, मँगो शेक्स असे विविध पदार्थही ठेवले आहेत.
बहारीनमध्ये भारतीय आंब्याची बहार
MangoAgrowon
Published on
Mango
MangoAgrowon

अपेडाने (APEDA) अल जझीरा ग्रुप आणि भारतीय दूतावासाच्या मदतीने बहारीन येथे आठ दिवसीय आंबा महोत्सव आयोजित केला आहे. १३ जूनपासून हा महोत्सव सुरू झाला आहे.

Mango
MangoAgrowon

बहारीनमधील भारताचे राजदूत पियुष श्रीवास्तव यांनी अल जझीरा समूहाचे अध्यक्ष अब्दुल हुसेन खलील दवाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत या आंबा महोत्सवाचे उद्घाटन केले. भारतीय आंब्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

Mango
MangoAgrowon

पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा आदी राज्यांत पिकणारे ३४ प्रकारचे आंबे बहारीन महोत्सवादरम्यान अल जझीरा ग्रुपच्या सर्व सुपरमार्केटमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

Mango
MangoAgrowon

यातील २७ जाती पश्चिम बंगालमधील आहेत तर प्रत्येकी दोन प्रकारचे आंबे बिहार आणि झारखंडचे आहेत. या महोत्सवात मांडण्यात आलेले आंबे थेट शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO) खरेदी करण्यात आले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com