BRITAIN-AGRICULTURE-LIFESTYLE-PLOUGHING | Page 3 ||| Agrowon

ब्रिटनमध्ये नांगरणी स्पर्धेची धामधूम

बुधवार, 13 ऑक्टोबर 2021

ब्रिटनमध्ये सध्या नांगरणीच्या राष्ट्रीय स्पर्धेची धामधूम आहे. गेल्या वर्षी ‘कोविड १९’च्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ही स्पर्धा रद्द झाली होती. या वर्षी उत्तर इंग्लंड येथील बरविक अपऑन ट्विड जवळच्या मिनड्रम मिल येथे दोन दिवसांची (ता. ९, १० रोजी) ७० वी ब्रिटिश राष्ट्रीय नांगरणी स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये नांगरणीचे १५ विभाग होते. (उदा. घोड्याच्या साह्याने नांगरणी, जुन्या पारंपरिक (व्हिंटेज) ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी आणि आधुनिक ट्रॅक्टरने नांगरणी इ.) ही स्पर्धा संपूर्ण ब्रिटनमधील नांगरणी करणाऱ्या स्त्री आणि पुरुषांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि मानाची मानली जाते.

ब्रिटनमध्ये सध्या नांगरणीच्या राष्ट्रीय स्पर्धेची धामधूम आहे. गेल्या वर्षी ‘कोविड १९’च्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ही स्पर्धा रद्द झाली होती. या वर्षी उत्तर इंग्लंड येथील बरविक अपऑन ट्विड जवळच्या मिनड्रम मिल येथे दोन दिवसांची (ता. ९, १० रोजी) ७० वी ब्रिटिश राष्ट्रीय नांगरणी स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये नांगरणीचे १५ विभाग होते. (उदा. घोड्याच्या साह्याने नांगरणी, जुन्या पारंपरिक (व्हिंटेज) ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी आणि आधुनिक ट्रॅक्टरने नांगरणी इ.) ही स्पर्धा संपूर्ण ब्रिटनमधील नांगरणी करणाऱ्या स्त्री आणि पुरुषांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि मानाची मानली जाते. या स्पर्धेतील विजेत्यांची निवड २०२२ मध्ये रशियामध्ये होणाऱ्या जागतिक नांगरणी स्पर्धेसाठी केली जाते.
(स्रोत ः ओली स्कॅरफ, वृत्तसंस्था) 

परदेश भारत