पावसाळ्यात धार काढताना ही काळजी घ्या!

गायीची धार काढण्याअगोदर गायीला चांगला खरारा करून घ्यावा. कास स्वच्छ, निर्जंतुक पाण्याने धुऊन घ्यावी.
Care while milking animals
Care while milking animalsAgrowon
Published on
Agrowon

स्वच्छ दूध उत्पादनामुळे दुधाची प्रत चांगली राहण्यास मदत होते. पावसाळ्यात वातावरणातील ओलावा वाढल्याने जीव-जंतूची वाढही मोठ्या प्रमाणात होत असते.

Agrowon

गायीची धार काढण्याअगोदर गायीला चांगला खरारा करून घ्यावा. कास स्वच्छ, निर्जंतुक पाण्याने धुऊन घ्यावी. धार काढण्यापूर्वी कास स्वच्छ कापडाने कोरडी करून घ्यावी.

Agrowon

धार काढणाऱ्या व्यक्तींचे हात स्वच्छ आणि कोरडे असावेत. त्यांची नखे कापलेली असावीत. दूध हलक्या हाताने मात्र वेगाने काढावे.

Agrowon

गायीची धार काढण्याची वेळ शक्यतो बदलू नये. दूध काढण्यासाठी वापरायची भांडी स्वच्छ, कोरड्या आणि निमुळते तोंड असलेल्या भांड्यात काढावी. भांडी शक्यतो स्टेनलेस स्टीलची असावी.

Agrowon

धार काढताना पूर्ण दूध काढून घ्यावे. धार काढण्याची पद्धत योग्य म्हणजे पूर्ण हात पद्धतीने धार काढली पाहिजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com