शेणखत वापरताना कोणती काळजी घ्याल?

शेणखतामध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण रासायनिक खतांच्या तुलनेत कमी असते. परंतु शेणखतामध्ये सेंद्रिय पदार्थ असल्याने सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी जमिनीत अनुकूल वातावरण तयार होत असते.
farm yard manure use
farm yard manure useAgrowon
Published on
Agrowon

शेणखताच्या नियमित वापरामुळे मातीच्या कणांच्या रचनेत बदल होतो. जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीतील मुळाच्या कार्यक्षमतेत वाढ होते. पांढऱ्या मुळांची वाढ जास्त होऊन, पिक निरोगी राहण्यास मदत होते.

Agrowon

हे शेण वापरत असताना ते चांगले कुजलेले असावे. अशा शेणामध्ये हुमणी, भुंगे, नारळावरील भुग्यांच्या अळ्या असतात. काही पशुपालक या किड्यांना शेणकिडे असे संबोधतात.

Agrowon

कुजणाऱ्या शेणात पिकाला हानिकारक बुरशी, मर रोग, मूळकुज, करपा, सड हे रोग निर्माण करणारी बुरशी नसावी.

Agrowon

जमिनीची मशागत करत असताना शेवटच्या कुळवणीआधी शेतात ५ ते १० टन चांगले कुजलेले टाकावे. भाजीपाल्यासाठी रोपवाटिका तयार करताना गादीवाफ्यावर चांगल्या कुजलेल्या शेणखताबरोबर ट्रायकोडर्माचा वापर करावा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com