गव्हाच्या गुणवत्तेचे निकष शिथिल

मार्च ते एप्रिल दरम्यानच्या उष्णतेच्या लाटेमुळे पंजाब आणि हरियाणातील गव्हाच्या उत्पादनात घट होईल, उत्पादनाला फटका बसेल, अशी शक्यता सबंधित राज्यातील कृषी अभ्यासकांनी वर्तवली होती.
Shrivelled wheat
Shrivelled wheatAgrowon
Published on
Shrivelled wheat
Shrivelled wheatAgrowon

गव्हाच्या सरकारी खरेदीत यावर्षी घट झाली आहे. ही घट लक्षात घेत केंद्र सरकारने भारतीय अन्न महामंडळामार्फत यापूर्वी खरेदी केलेल्या गव्हाच्या गुणवत्तेचे निकष शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. या गव्हाच्या उपलब्धतेमुळे केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी शक्य होणार आहे.

Wheat Procurement
Wheat ProcurementAgrowon

सरकारी खरेदी केंद्रांवर १८ टक्क्यांपर्यंत आकसलेला, तडकलेला गहू हमीभावाने खरेदी करण्यात आला आहे. या गव्हाच्या दरात कुठलीही कपात करण्यात आलेली नाही. यापूर्वी हा निकष ६ टक्क्यांवर होता.

Shrivelled wheat
Shrivelled wheatAgrowon

२०२०-२०२१ च्या विपणन वर्षात पंजाबमध्ये १२ टक्क्यांपर्यंत आकसलेल्या गव्हाची खरेदी करण्यात आली होती. उत्तर प्रदेशात १२ टक्क्यांपर्यंत आकसलेल्या गव्हाला हमीभावाचा लाभ देण्यात आला होता. हरियाणातील १० टक्के आकसलेल्या गव्हाची खरेदी करण्यात आली होती.

Wheat Procurement
Wheat ProcurementAgrowon

मार्च ते एप्रिल दरम्यानच्या उष्णतेच्या लाटेमुळे पंजाब, हरियाणासह अनेक गहू उत्पादक राज्यातील गव्हाला फटका बसला. या उष्णतेच्या लाटेमुळे गहू आकसून गेला. या पार्श्वभूमीवर पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांनी गेल्या महिन्यात केंद्र सरकारला गव्हाच्या हमीभावाने खरेदीचे निकष शिथिल करण्याची विनंती केली होती.

broken wheat grain
broken wheat grainAgrowon

भारतीय अन्न महामंडळाने केंद्र सरकारला तशी शिफारस केली होती. त्यामुळे केंद्र सरकारने २० टक्क्यांपर्यंत आकसलेल्या गव्हाला हमीभावाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com