शेळ्यांचे गोचीडांपासून संरक्षण कसे कराल ?

गोचिडच्या चाव्यामुळे जनावरांना टिक पॅरॅलिसिस नावाचा आजार होण्याची शक्यता असते. शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाल्याने शेळ्या-मेंढ्यांना ॲनिमिया होण्याची शक्यता असते.
शेळ्यांचे गोचीडांपासून संरक्षण कसे कराल ?
Control measure for external parasites- GochidAgrowon
Published on
Agrowon

गोचीड जनावरांच्या कातडीला चिकटून रक्त शोषून घेतात. एक गोचीड एका आठवड्यात अर्धा ते एक मिलीपर्यंत रक्त शोषत असते.

Agrowon

गोचीड कानाच्या आतील भाग, शेपटीचा गोंडा, शेपटीच्या खालील भाग, कासेचा तसेच मानेच्या खालील भाग यांसारख्या शरीर अवयवांवर आढळून येते. याव्यतिरिक्त गोचीड आणि त्यांची अंडी गोठ्यात, जमिनीवर, गव्हाणीतील भेगा याठिकाणीही आढळून येतात.

Agrowon

गोचीड निर्मुलन करताना फक्त जनावरांच्या शरीरावरील गोचीड निर्मुलन करून चालत नाही. या सोबतच गोठ्यातील, आजूबाजूच्या परिसरातील गोचीड आणि अंड्यांचाही नायनाट करावा लागतो.

Agrowon

गोचीड निर्मुलनासाठी विविध पद्धतींचा वापर केल्यास, चांगला फायदा दिसून येतो. यामध्ये रासायनिक, भौतिक आणि जैविक पद्धतींचा समावेश होतो.

Agrowon

शेळ्या किंवा मेंढ्यांना कुरणावर चरायला नेताना क्षेत्रांची फेरपालट करावी. मोठी कुरणे असल्यास, त्यांची विभागणी करून सुरुवातीला एका भागावर तर काही दिवसांनी दुसऱ्या भागांवर चरायला सोडावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com