खानदेशात सोयाबीनची आवक बंदावस्थेत

खानदेशात सोयाबीनची आवक बंदावस्थेत
खानदेशात सोयाबीनची आवक बंदावस्थेत

जळगाव  ः सोयाबीनची मळणी खानदेशात जवळपास पूर्ण झाली आहे. यंदा अतिपावसामुळे सोयाबीनच्या पिकाला फटका बसल्याने उत्पादन कमी हाती आले आहे. परिणामी, बाजार समित्यांमधील आवकही कमी झाली आहे. परंतु, मागील पाच ते सात दिवसांपासून आवक बंदावस्थेत आहे. कमाल शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली आहे. सध्या दर्जेदार सोयाबीनचे दर पाच हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. तर कमी दर्जाच्या सोयाबीनचे दर २४०० रुपयांपर्यंत आहेत.   सोयाबीनची पेरणी खानदेशात जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, पाचोरा भागांत केली जाते. यापाठोपाठ नंदुरबारमधील शहादा, तळोदा, धुळ्यातील शिरपूर तालुक्‍यांत केली जाते. सोयाबीनचे पीक जोमात होते. परंतु, अतिपावसामुळे काढणीवर आलेल्या पिकाला फटका बसला. उशिरा पेरलेले पीकच हाती आले. इतर शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यंदा एकरी तीन ते चार क्विंटल उत्पादन काही शेतकऱ्यांना मिळाले आहे. परंतु, सोयाबीनचा दर्जा खालावला आहे. तो वाळवून त्याची स्वच्छता शेतकऱ्यांना करावी लागली. या महिन्याच्या सुरवातीला बाजारात सोयाबीनची आवक प्रतिदिन दोन हजार क्विंटलपर्यंत होती. सोयाबीनसाठी जिल्ह्यात जळगाव, अमळनेर व चोपडा येथील बाजार प्रसिद्ध आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात शहादा येथील बाजार प्रसिद्ध आहे. या सर्व बाजारांमध्ये रोज मिळून दोन हजार क्विंटलदेखील सोयाबीनची आवक सध्या होत नसल्याची स्थिती आहे. जळगाव व चोपडा येथील बाजारात तर आठवड्यात मिळून २०० ते ३०० क्विंटलही आवक होत नाही. यामुळे उलाढाल कमी झाली आहे. परिणमी दर टिकून आहेत, अशी माहिती मिळाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com