कोंबड्यांना कोणते खाद्य द्यावे?

कुक्कुटपालनाचा व्यवसाय करताना त्यांच्या खाद्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास रोगाला प्रतिबंध करणे सोयीस्कर जाते.
Feeding Management in Broiler Poultry Farming
Feeding Management in Broiler Poultry FarmingAgrowon
Published on
Agrowon

कोंबड्यांना सुरुवातीचे काही दिवस भरडलेला मका खाण्यास द्यावा. त्यानंतर पुढील चार आठवडे त्यांना स्टार्टर खाद्य द्यावे. त्यापुढील चार आठवडे फिनिशर दिलं पाहिजे.

Agrowon

साधारणपणे कोंबडीचे एक पिल्लू आठ आठवड्याचे होईपर्यंत २.६ किलो खाद्याची गरज पडते.

Agrowon

पहिला पूर्ण आठवडा भरडलेला मका देत असताना, तिसऱ्या दिवसापासून स्टार्टर खाद्य देण्यास सुरुवात करावी. स्टार्टरचे प्रमाण प्रति पक्षी १० ग्रॅम याप्रमाणे द्यावे.

Agrowon

दुसऱ्या आठवड्यात खाद्याचे प्रमाण वाढवून २० ग्रॅम प्रति पक्षी या प्रमाणात द्यावे. तिसऱ्या आठवड्यात ३० ग्रॅम प्रति पक्षी असे द्यावे.

Agrowon

चौथ्या आठवड्यापर्यंत ४० ग्रॅमपर्यंत मात्रा वाढवत न्यावी. पाचव्या आठवड्यापासून प्रति पक्षी ५० ग्रॅम फिनिशर खाद्य द्यावे. सहाव्या आठवड्यात फिनिशरचे प्रमाण ६० ग्रॅमपर्यंत न्यावं. आठव्या आठवड्यात प्रति पक्षी ८० ग्रॅम फिनिशर खाद्य द्यावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com