पंजाबमध्ये पाणी बचतीसाठी रोख बक्षीस

संगरूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही पाणीबचत योजना प्रायोगिक स्वरूपात राबवण्यात येत आहे. खरिप हंगामात शेतकऱ्यांना प्रति १ हजार लिटर पाणी बचतीमागे २ रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.
पंजाबमध्ये पाणी बचतीसाठी रोख बक्षीस
Water Conservation Agrowon
Published on
Water Conservation
Water Conservation Agrowon

राज्यातील भूजल पातळीत होणारी घट लक्षात घेऊन पंजाब सरकारने दीर्घकाळासाठी शाश्वत शेतीचे नियोजन करण्यावर भर दिला आहे. भातपिकाची पारंपरिक पद्धत सोडून थेट बियाणे पेरणी करणाऱ्या (DSR) शेतकऱ्यांना पंजाब सरकार एकरी १५०० रुपयांची आर्थिक मदत देणार आहे.

Water Conservation
Water Conservation Agrowon

याशिवाय आता राज्य सरकार पाण्याची बचत करणाऱ्या शेतकऱ्यांना रोख बक्षीस देणार आहे. संगरूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही पाणीबचत योजना प्रायोगिक स्वरूपात राबवण्यात येत आहे. खरिप हंगामात शेतकऱ्यांना प्रति १ हजार लिटर पाणी बचतीमागे २ रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

Water Conservation
Water Conservation Agrowon

संगरूर जिल्हा कृषी मुख्यालयाकडून सुनम आणि धुरी या गटातील शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे. या प्रायोगिक योजने अंतर्गत कृषी विभाग कमी काळात हाती येणाऱ्या पिकाचे वाण शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून देणार आहे. तसेच पाणी बचतीचे धडे देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमही आयोजित करण्यात येत आहेत.

Water Conservation
Water Conservation Agrowon

शेतकऱ्यांकडून या खरिपात सिंचनासाठी किती पाणी वापरण्यात आले, हे पाहण्यासाठी ट्यूबवेलमध्ये पायझोमीटर बसवण्यात येत आहेत. या मीटरमुळे भातपिकाच्या पारंपारिक वाणांना किती पाणी लागत होते आणि अल्पकाळात हाती येणाऱ्या संशोधित वाणामुळे पाण्याची किती बचत झाली हे समजणार आहे.

Water Conservation
Water Conservation Agrowon

शेतकऱ्यांना प्रति १ हजार लिटर पाणी बचतीसाठी २ रुपये अशा हिशोबाने रोख बक्षीस दिले जाणार आहे. या दोन्ही गटात ३४ क्लस्टर्सची निवड करण्यात आली आहे. एका क्लस्टरमध्ये ५० एकर शेतजमिनीचा समावेश असणार आहे.

Water Conservation
Water Conservation Agrowon

सर्वाधिक पाणी लागणाऱ्या भातपिकाच्या 'पुसा ४४'ला पर्याय म्हणून 'पीआर १२६' या वाणाचा पर्याय समोर आणण्यात आला आहे. कमी पाण्यात जास्त उत्पादन देणाऱ्या या वाणाचा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यभरात त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com