१० लाख टन साखर निर्यातीला परवानगी

गहू निर्यातीबाबत प्रत्येक लेटर ऑफ क्रेडीटची (LC) छाननी करणाऱ्या केंद्र सरकारने १ दशलक्ष टन साखर निर्यातीला संमती दिली आहे. निर्यातीसाठी अर्ज केलेल्यांना ही निर्यात करता येणार आहे.
१० लाख टन साखर निर्यातीला परवानगी
Sugar ExportAgrowon
Published on
Sugar Export
Sugar ExportAgrowon

साखर निर्यातीस संमती मिळालेल्या कंपन्यात श्री दत्त इंडियाला १ लाख ७७ हजार १४१ टन निर्यातीची परवानगी देण्यात आली. श्री रेणुका शुगर्सला १ लाख ३७ हजार ४१५ टन आणि गार्डन कोर्ट डिस्टलरीजला १ लाख ३ हजार ४२४ टन निर्यातीची परवानगी देण्यात आली.

Sugarcane
SugarcaneAgrowon

एकूण ६२ साखर कारखाने आणि निर्यातदारांनी नॅशनल सिंगल विंडो सिस्टिम्सच्या माध्यमातून २.३ दशलक्ष टन साखर निर्यातीसाठी ३२६ प्रस्ताव दाखल केले होते. या सर्व प्रस्तावाचा विचार करून केंद्रीय अन्न मंत्रालयाने १ दशलक्ष टन साखर निर्यातीस संमती दिली असून ९० दिवसांच्या आत निर्यात करण्याची सूचना केली आहे.

Sugar Factory
Sugar FactoryAgrowon

निर्यातीस संमती मिळालेल्या कंपन्यांना दर आठवड्याला यासंदर्भातील प्रोग्रेस रिपोर्ट साखर संचलनालयाकडे दाखल करायचा आहे. सरकारने यापूर्वी ठरवल्याप्रमाणे कारखान्यांना १ दशलक्ष टन साखर निर्यातीची संधी दिली तर चांगले झाले असते, कारखान्यांना त्यांची साखर निर्यात करता आली असती, अशी प्रतिक्रिया कारखानदारांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Sugar Production
Sugar ProductionAgrowon

साखर निर्यातीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली यंत्रणा अपुरी आहे, या माध्यमातून होणाऱ्या निर्यातीचे प्रमाणही पुरेसे मोठे नाही, त्यामुळे सरकारने निर्यातीसाठी दाखल केलेल्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार असल्याचे अधिकृत सूत्रांनी म्हटले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com