Wheat Flower
Wheat FlowerAgrowon

Wheat Price Rise:दरवाढीवर सरकारची नजर

मार्च ते एप्रिल महिन्यात देशभरातील उष्णतेच्या लाटेमुळे (Heatwave) गव्हाच्या उत्पादनात घट झाली. भारतीय अन्न महामंडळ (FCI) शेतकऱ्यांकडून हमीभावाने गहू खरेदी करते. यंदा या सरकारी गहू खरेदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ५७ टक्क्यांची घट झाली.
Published on
Wheat
WheatAgrowon

गव्हाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव वाढत आहे. देशांतर्गत बाजारात गव्हाचे दर वाढत असल्यामुळे प्रक्रिया उद्योगाने केंद्र सरकारकडे लॉबिंग सुरू केले आहे.

Wheat
WheatAgrowon

देशांतर्गत बाजारात गव्हाच्या दरात १० टक्क्यांची वाढ झाल्यामुळे सरकार सावध झाले आहे. गव्हाची उपलब्धता वाढावी आणि दर नियंत्रणात राहावेत, यासाठी उपाययोजना करण्याची ग्वाही सरकारने दिली आहे.

Wheat
WheatAgrowon

केंद्र सरकारने खुल्या बाजार विक्री योजने अंतर्गत (OMSS) गहू उपलब्ध करून द्यावा तसेच गव्हावरील आयात शुल्क सध्याच्या ४० टक्क्यांवरून शून्य टक्क्यांवर आणावे, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली. याशिवाय गव्हाचे साठवणूकदार, व्यापारी आणि मिलर्स यांनी आपापल्याकडील गव्हाच्या उपलब्धतेची माहिती उघड करावी, यावरही सहमती दर्शवण्यात आली.

Wheat
WheatAgrowon

रोलर मिल्स फेडरेशन ऑफ इंडिया (RFMFI- आरएफएमएफआय) या संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच केंद्रीय अन्न मंत्रालयाचे सचिव सुधांशु पांडे यांची भेट घेतली. देशात गव्हाचे दर वाढत असल्याबद्दल शिष्टमंडळाने चिंता व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com