Animal Death News : अशी होते जनावरांना ‘नायट्राईट’ची विषबाधा !

युरियामध्ये नत्राचे प्रमाण हे ४६ टक्के असते. पिकांच्या शाखीय वाढीसाठी नत्राची म्हणजे नायट्रोजनची आवश्यकता असते. नत्रयुक्त खतांचा वापर जास्त प्रमाणात केल्यास पिकांतील क्षारांचे प्रमाण देखील वाढते.
Nitrate poisoning in cattle
Nitrate poisoning in cattle Agrowon
Published on
Nitrate poisoning in cattle
Nitrate poisoning in cattle Agrowon

जास्त नत्र असलेला चारा जनावरांनी खाल्ल्यानंतर त्यांना नायट्रेटची विषबाधा होण्याची दाट शक्यता असते. हा नायट्रेट युक्त चारा पोटात गेल्यानंतर रक्तात मिसळेपर्यंत नायट्राईटमध्ये रुपांतरीत होत असतो.

Nitrate poisoning in cattle
Nitrate poisoning in cattle Agrowon

नायट्राईट रक्तातील हिमोग्लोबिन बरोबर संयोग पावते आणि मेट हिमोग्लोबिन तयार होते. असे झाल्याने रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते.

Nitrate poisoning in cattle
Nitrate poisoning in cattle Agrowon

तीव्र विषबाधा झालेली असल्यास, जनावरे कोणतीही लक्षणे न दाखविता मृत्युमुखी पडतात. विषबाधेची तीव्रता मध्यम स्वरुपाची असल्यास, जनावरांना श्वसनास त्रास होतो.

Nitrate poisoning in cattle
Nitrate poisoning in cattle Agrowon

रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने, जनावरांचा गुदमरून मृत्यु होतो. चाऱ्यातील नायट्राईटचे प्रमाण १.५ टक्क्यापेक्षा जास्त असल्यास जनावरांच्या आरोग्यास घातक असते.

Agrowon
agrowon.esakal.com