म्हशींच्या रेडकांचे मृत्यु होण्याची कारणे!

रेड्काचा जन्म झाल्यापासून १० ते १५ दिवसात त्यांना जंताचा प्रादुर्भाव होत असतो. योग्य व्यवस्थापन केल्यास, रेड्काच्या मृत्यूचे प्रमाण कमी करता येऊ शकते.
Buffalo Calf
Buffalo CalfAgrowon
Published on
Agrowon

आपल्याकडील सरासरी ५० टक्के रेड्कांचा मृत्यु होत असतो. रेडकांचे बहुतांश मृत्यु हे त्यांचे वय सहा महिने असतानाच होत असतो.

Agrowon

जन्मानंतर दहाव्या दिवशी रेडकाला जंताचे औषध न दिल्यास जंत प्रादुर्भावाची शक्यता वाढते.

Agrowon

जन्मतः रेडकाची कमी असलेली रोगप्रतिकारशक्ती विविध आजारास कारणीभूत ठरते. रेड्काच्या वजनानुसार १५ टक्के चिक २४ तासात दोन ते तीन वेळा विभागून पाजावा.

Agrowon

जीवनसत्त्व 'अ'च्या कमतरतेमुळे रेडकाची वाढ खुंटते. त्वचा रोग होऊन, ती निस्तेज दिसू लागते. यासाठी रेडकांना महिन्यातून पाच दिवस जीवनसत्त्वाची टॉनिक दिली पाहिजे.

Agrowon

बदलत्या वातावरणाचा देखील रेड्कांच्या वाढीवर परिणाम होत असतो. निवाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून, बदलत्या वातावरणापासून रेडकांचे संरक्षण करू शकता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com