Wheat Export Ban
Wheat Export BanAgrowon

गहू निर्यातबंदीचा बाजारावर परिणाम

Wheat Export Ban- भारत आणि शेजारील देशांमध्ये अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते, असे कारण देत केंद्र सरकारने 13 मे रोजी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली.
Published on

सध्या बाजारातील गव्हाच्या किमतीमध्ये घट झाली आहे. मोठ्या व्यापाऱ्यांकडे गव्हाचा साठा शिल्लक आहे. मात्र त्यांनी पुढील खरेदी थांबवली आहे.

गेल्या आठवड्यात लावलेल्या गव्हाच्या निर्याबंदीमुळे गव्हाचा व्यापार जवळजवळ ठप्प झाला आहे. व्यापारी आणि निर्यातदार सरकारच्या स्पष्ट भूमिकेची वाट पाहत आहेत.

भारत आणि शेजारील देशांमध्ये अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते, असे कारण देत केंद्र सरकारने 13 मे रोजी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली.

सरकारच्या या निर्णयामुळे देशांतर्गत गव्हाच्या किमतीमध्ये घट झाली आहे. यंदा उष्णतेच्या लाटेमुळे गव्हाच्या उत्पादनात घट झाली आहे. भारताच्या गव्हाला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला भाव मिळत होता.

रशिया आणि यूक्रेन यांच्यातील संघर्षामुळे जागतिक पातळीवर अन्नधान्याच्या दरांमध्ये तेजी आली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com