गादी पध्दतीमध्ये जमिनीवर बेडिंग मटेरीअल म्हणून लाकडाचा भुसा, शेंगाची टरफले, भाताचे तूस वापरले जातात. कोंबडयाची विष्ठा लिटरवर पडल्याने विष्ठेतील आर्द्रता शोषली जाते.(Deep litter method in poultry farming)
लिटर दररोज वर खाली केले जाते. जेणेकरून त्यातील अमोनिया निघून जाण्यास मदत होते. लिटरमधील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यास, त्यामध्ये चुना मिसळला जातो. त्यामुळे लिटर कोरडे राहण्यास मदत होते.
डीप लिटर सिस्टीम ही पद्धत आर्थिकदृष्ट्या सोयीची असते. या पद्धतीत पक्षांना स्वच्छ, आरामदायक वातावरण मिळत असते. एका पक्षाला सुमारे १ ते २ चौरस फूटापर्यंत जागा मिळते.
डीप लिटर पद्धतीमध्ये कमी जागेत भरपूर कोंबड्या पाळता येतात. या पद्धतीत कोंबड्यांचे मांस उत्पादन चांगले मिळते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.