मॉन्सून कोकणात दाखल होण्याचे संकेत

राज्यात पूर्वमोसमी पावसाला (Pre-Season Rain) पोषक हवामान झाल्याने विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
मॉन्सून कोकणात दाखल होण्याचे संकेत
Mansoon In GaoAgrowon
Published on

नैॡत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) (Monsoon) वाटचाल वेगाने सुरू आहे. दोनच दिवसांत मॉन्सून कोकणात (Monsoon In Konkan) दाखल होण्याचे संकेत आहेत.

यातच राज्यात पूर्वमोसमी पावसाला (Pre-Season Rain) पोषक हवामान झाल्याने विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

आज (ता. १) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यता (Rain Prediction) हवामान विभागाने वर्तविली आहे

उत्तर केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीजवळच्या अरबी समुद्रात असलेले चक्राकार वारे, त्यापासून नैॡत्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे.

राज्याच्या विविध भागांत पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असून, आज (ता. ३१) तळ कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राजस्थान आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून उत्तर बांगलादेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com