जनावरांसाठी ज्वारीचा चारा !

एकदल चारा पिकांमध्ये ज्वारी हे चांगली वाढ होणारे आणि उत्तम चारा उत्पादन देणारे पिक आहे. अन्नधान्य म्हणून ज्वारीची लागवड करताना, त्यापासून हिरवा चारा मिळत नाही. हिरव्या चाऱ्यासाठी कडवळ म्हणून ज्वारीची लागवड केली जाते.
Kharif Jowar Fodder Plantation
Kharif Jowar Fodder PlantationAgrowon
Published on
Agrowon

ज्वारीसाठी उष्ण व कोरडे हवामान पोषक असते. मात्र चारा पिक म्हणून तिन्ही हंगामात ज्वारीचे उत्पादन घेता येते. ज्वारीमध्ये

Agrowon

ज्वारीची पेरणी योग्य वेळी करून तसेच सुधारित वाणांचा वापर केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. जमिनीचा सामू ५.५ ते ८.५ असलेल्या जमिनीत ज्वारीची वाढ चांगली होते

Agrowon

पेरणी करताना ज्वारीच्या प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर जीवाणु संवर्धकाची प्रक्रिया करावी. अॅझोटोबॅक्टरमुळे हवेतील नत्राचे स्थिरीकरण होऊन पिकाला नत्राची उपलब्धता होते.

Agrowon

ज्वारीची चाऱ्यासाठी कापणी पेरणीनंतर ६५ ते ७० दिवसांनी पिक फुलोऱ्यात येत असते, तेव्हा पहिली करावी. एक हेक्टर क्षेत्रातून ५०० ते ५५० क्विंटल चाऱ्याचे उत्पादन मिळते.

Agrowon

फुले रुचिरा, फुले अमृता, फुले गोधन, एफ. आर. आय-१ आणि २ या वाणांची लागवड करावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com