हॅचरीमध्ये पिल्लांना ही लस दिली जाते !

कोंबड्यांची एक दिवसीय पिल्ले हॅचरीमध्ये असताना त्यांचे मॅरेक्स रोगाविरुद्ध लसीकरण न केल्यास त्यांना मॅरेक्सरोगाची बाधा होते.
हॅचरीमध्ये पिल्लांना ही लस दिली जाते !
Marek's Disease Vaccination Agrowon
Published on
Agrowon

कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास त्यांना रोगाची बाधा लवकर होते. रोगजंतू आणि रोगजंतुच्या प्रसारास अनुकूल परिस्थिती कुठल्याही रोगास कारणीभूत असते.

Agrowon

कोंबड्यांमध्ये मॅरेक्स नावाच्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. मॅरेक्स हा रोग विषाणूंमुळे होतो.

Agrowon

या रोगामध्ये कोंबड्यांचे पाय लुळे पडतात. कोंबड्यांचे पाय, पंख, मान लुळी पडते. कोंबड्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. कोंबड्यांची विष्ठा पातळ पडते. पिसांच्या मुळाशी सूज दिसून येते.

Agrowon

या रोगाची बाधा सहा ते दहा आठवडे वयाच्या पिल्लांमध्ये दिसून येते. मोठ्या पक्ष्यांमध्ये पाचव्या ते सहाव्या महिन्यात या रोगाची बाधा दिसून येते.

Agrowon

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिल्ले एक दिवसाची असताना मॅरेक्स रोगाविरुद्ध कोंबड्यांना लस द्यावी. ०.२० मिली लस त्वचेखाली दिली जाते. ही लस पिल्ले हॅचरीमध्ये असताना दिली जाते. ही लस दिली न गेल्यास कोंबड्यांना या रोगाची बाधा दिसून येते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com