शेतीसोबत पूरक व्यवसाय म्हणून लोक आपल्याकडे पशुपालन व दुग्ध व्यवसायाकडे वळतात. गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या पाळतात. मांस आणि दूध अशा दुहेरी उद्देशाने शेळी वा मेंढीपालन केले जाते. व्यवसाय म्हणून कोणी गाढव पाळल्याचे आपल्या फार ऐकिवात नसते. मात्र आता या व्यवसायाकडेही गांभीर्याने बघितले जाईल, अशी शक्यता आहे.
कर्नाटकातील एका सुशिक्षित व्यक्तीने डॉंकी फार्मिंग अर्थात गाढवं पाळली आहेत. मंगळूरूपासून जवळच श्रीनिवास गौडा यांचे डॉंकी फार्म व ब्रीडिंग सेंटर आहे. गौडा हे बंगळुरुजवळील रामनगर या गावाचे रहिवासी आहेत. त्यांनी आता गाढवंही पाळायला सुरुवात केली.
गौडा यांचे डॉंकी फार्म हे कर्नाटकातील पहिले आणि देशातील दुसरे डॉंकी फार्म ठरले आहे. यापूर्वी केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील राममंगलम येथे देशातील पहिला डॉंकी फार्म उभारण्यात आलाय.
देशातील पहिला डॉंकी फार्म सुरु करणाऱ्या ॲबी बेबी यांनीही गाढवाच्या दुधाला असणारे महत्व लक्षात घेऊन हा व्यवसाय सुरु केला होता. त्यांच्यानंतर आता कर्नाटकात असा डॉंकी फार्म सुरु करण्यात आला आहे.
श्रीनिवास गौडा यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. बंटवाल तालुक्यात गौडा यांनी २.३ एकर परिसरात शेती करायला सुरुवात केली.तिथे त्यांनी 'आयसरी फार्म'ची स्थापना केली. शेतीसोबतच पशुपालन, पशुवैद्यकीय सेवा, चारा विकास व प्रशिक्षण केंद्र सुरु केले. २०२० साली गौडा यांनी शेळीपालन सुरु केले. गौडा यांच्याकडे ससे, कडकनाथ कोंबड्या आहेत. याच शेतीत गौडा यांनी गाढवं पाळायला सुरुवात केली. सध्या त्यांच्याकडे शेतात २० गाढव आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.