'नाफेड'च्या कांदा खरेदीत गौडबंगाल ?

राज्यात ‘नाफेड’ने २.५० लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवून खरेदी चालू आहे. मात्र कांदा खरेदीत उत्पादकांना वेगवेगळ्या जिल्ह्यांत वेगवेगळे दर दिले जात आहेत.
'नाफेड'च्या कांदा खरेदीत गौडबंगाल ?
Onion Procurement Agrowon
Published on

‘नाफेड’ने एकाच भावाने कांदा खरेदी करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने पुन्हा एकदा केली आहे.

राज्यात ‘नाफेड’अंतर्गत २.५० लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवून खरेदी चालू आहे. मात्र कांदा खरेदीत उत्पादकांना वेगवेगळ्या जिल्ह्यांत वेगवेगळे दर दिले जात आहेत.

खरेदीत गौडबंगाल आहे. १६ जूनच्या ‘नाफेड’च्या खरेदी दरात पुणे व नाशिक जिल्ह्यांतील भावात क्विंटलमागे २८० रुपये फरक आहे. तो कसा, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे.

मागील महिन्यातील २१ व २२ मे रोजी नाशिक व पुणे जिल्ह्यांतील प्रतिक्विंटल दर अनुक्रमे १,१८०.१७ व १,०३७.५० असे होते. त्यात नाशिकचा दर जास्त होता.

मात्र १६ जून रोजीच्या खरेदीत नाशिकचा दर १,५०९ व पुणे जिल्ह्याचा दर १,७८७ इतका आहे. या दरात २८० रुपयांचा फरक का, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com