Nano Liquid Urea: नॅनो युरिया भरून काढेल पारंपरिक युरियाची गरज

२०२५ अखेरीस ८ निर्मिती प्रकल्पांच्या माध्यमातून वर्षाकाठी नॅनो युरियाच्या ४४ कोटी बाटल्या बाहेर पडतील. ज्या पारंपरिक २०० लाख मेट्रिक टन युरियाची गरज भागवू शकतील, असे मंत्रालयाचे म्हणणे आहे.
Conventional Urea
Conventional UreaAgrowon
Published on
Urea
UreaAgrowon

पारंपारिक युरियाची गरज नॅनो युरिया भरून काढेल, असा विश्वास केंद्रीय खते, रसायन मंत्री मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केला.शेतकऱ्यांकडून नॅनो युरियाला (Nano Urea) मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Urea
UreaAgrowon

नॅनो युरियाच्या ३९० लाख बाटल्या देशाच्या विविध भागात रवाना करण्यात आल्या आहेत, त्यातील २८७ लाख बाटल्या या ऑगस्ट २०२१ ते जून २०२२ दरम्यान विकल्या गेल्या आहेत.

Urea
UreaAgrowon

मांडवीय यांनी बुधवारी (६ जून) नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी नॅनो युरियाची (Nano Urea) विश्वासाहर्ता वाढत असून २०२५ नंतर देशाला युरियाची आयात करण्याची गरज भासणार नसल्याचे सांगितले. वर्षभरातील युरियाची गरज ही पारंपरिक युरियाचे उत्पादन आणि नॅनो लिक्विड युरियाच्या (Nano Liquid Urea) माध्यमातून भागवली जाईल.

Nano Liquid Urea
Nano Liquid UreaAgrowon

नॅनो लिक्विड युरियाच्या (Nano Liquid Urea) चाचण्या दरम्यान नॅनो युरियाच्या वापरामुळे उत्पादनात ८ टक्क्यांची वाढ झाल्याचे सिद्ध झाले. १ ऑगस्ट २०२१ पासून नॅनो लिक्विड युरियाचे व्यावसायिक उत्पादन होत असून पूर्वीपेक्षा आता उत्पादनात वाढ झाली असल्याचेही मांडवीय यांनी सांगितले.

Urea
UreaAgrowon

पारंपारिक युरियाची (Conventional Urea) गरज नॅनो लिक्विड युरियाने भरून काढल्यास सरकारला वर्षाकाठी ४० हजार कोटींचे परकीय चलन वाचवणे शक्य होईल, असा अंदाज केंद्रीय खते व रसायन मंत्रालयाने व्यक्त केला. २०२३-२०२४ नंतर भारताला युरिया आयातीची गरज भासणार नसल्याची शक्यताही या मंत्रालयाने व्यक्त केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com