Edible Oil: देशातील तेलबिया पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी एनडीडीबीचा पुढाकार

एनडीडीबीने (NDDB) कर्नाटक ऑईलसीड फेडरेशन (KOF), कृषी विज्ञान विद्यापीठ, बेंगळुरू आणि भारतीय तेलबिया संशोधन संस्था, हैदराबाद या संस्थांसोबत नुकताच सामंजस्य करार केला आहे. (Oilseed Crop Production)
Oilseed NDDB
Oilseed NDDBAgrowon
Published on

भारताला (India) खाद्यतेलाच्या (Edible Oil) बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी आणि देशभरात तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ म्हणजेच एनडीडीबी (NDDB) विशेष प्रयत्न करणार आहे. या मोहिमेला कर्नाटकातून (Karnataka) सुरूवात करण्यात आली आहे.

कर्नाटक राज्यात सूर्यफुलाचे उत्पादन वाढविण्यासाठी एनडीडीबीने मोहीम हाती घेतलीय. एनडीडीबीने कर्नाटक ऑईलसीड फेडरेशन (केओएफ), कृषी विज्ञान विद्यापीठ, बेंगळुरू आणि भारतीय तेलबिया संशोधन संस्था, हैदराबाद या संस्थांसोबत नुकताच सामंजस्य करार केला आहे.

त्यामुळे सूर्यफुलाच्या KBSH-41 या संकरित वाणाचे व्यावसायिक उत्पादन घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे म्हणाल्या की, खाद्यतेलाच्या बाबतीत आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी एनडीडीबीने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. तेलबिया पिकांच्या बाबतीत चांगल्या गुणवत्तेचे बियाणे मिळणे ही मोठी अडचण आहे.

देशाचा विचार करता कर्नाटक राज्य सूर्यफूल उत्पादनात अग्रेसर आहे. एनडीडीबीने हाती घेतलेल्या या मोहिमेत म्हणूनच सूर्यफुलाला प्राधान्य देण्यात आले. त्यासाठी शेतकऱ्यांना कमी किंमतीत उच्च दर्जाचे बियाणे पुरवण्यात येणार आहे.

एनडीडीबीने कर्नाटक ऑईलसीड फेडरेशनच्या मदतीने यंदाच्या रबी हंगामात पाच हजार क्विंटल संकरित सूर्यफुलाचे बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. हे बियाणे सुमारे एक लाख हेक्टरवर सूर्यफुल पेरणी करण्यासाठी पुरेसे ठरेल.

येणाऱ्या काळात भुईमूग आणि मोहरी या तेलबिया पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी देशातील इतर राज्यांतही एनडीडीबीकडून उपक्रम राबविले जाणार आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com