Maharashtra Cabinet :मराठवाड्याच्या वाट्याला चार मंत्रीपदे

महिनाभरापेक्षा अधिक काळ रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला (Cabinet Expansion) आज अखेर मुहूर्त मिळाला. या मंत्रिमंडळात मराठवाड्याच्या वाट्याला ४ मंत्रीपदे मिळाली आहेत.
Shinde & Fadanvis
Shinde & FadanvisAgrowon
Published on
Atul Save
Atul SaveAgrowon

शिंदे गटातून विभागाला तीन मंत्रीपदे देण्यात आलीत. तर भाजपकडून अतुल सावे यांना मंत्रीदाची संधी देण्यात आलीय. सावे औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. सावे फडणवीस मुख्यमंत्रीपदी असताना शेवटच्या काळात राज्यमंत्री होते. शिंदे यांच्या मंत्रीमंडळात सावेंना बढती मिळाली आहे.

Tanaji Sawant
Tanaji SawantAgrowon

भूम- परांडा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली. फडणवीस सरकारमध्ये ते जलसंधारण मंत्री होते. महाविकास आघाडीमध्ये मध्ये मंत्रिपदाची संधी हुकल्याने ते नाराज होते.

Sandipan Bhumare
Sandipan BhumareAgrowon

ठाकरे सरकारमध्ये उच्च व तंत्रशिक्षणमंत्री असलेले उदय सामंत आणि फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री असलेले संदीपान भुमरे यांना शिंदे मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे.

Abdul Sattar
Abdul SattarAgrowon

शिंदे गटातील अब्दुल सत्तार यांनाही या मंत्रिमंडळात संधी मिळाली. काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या सत्तार यांनी यापूर्वी राज्यमंत्री म्हणून केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com