हरभरा उत्पादकांना द्या रोख अनुदान:आयपीजीए

केंद्र सरकारने २६ लाख टन हरभऱ्याची खरेदी केली.मात्र त्यानंतरही देशात मोठ्या प्रमाणात हरभऱ्याचा साठा उपलब्ध आहे. याशिवाय देशात खरीपाची लागवड सुरु असून शेतकऱ्यांकडून कडधान्याची लागवड केली जात आहे. त्यामुळे कडधान्याचा साठा आणखी वाढणार आहे.
हरभरा उत्पादकांना द्या रोख अनुदान:आयपीजीए
PulsesAgrowon
Published on
pulses
pulsesAgrowon

देशभरातील विक्रमी उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर हरभऱ्याचे दर घसरले आहेत. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी किमतीत हरभरा विकल्या जात आहे.

Pulses
PulsesAgrowon

हरभरा निर्यातीसाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना रोख अनुदान देण्यात यावे, अशी मागणी कडधान्य निर्यातदार आणि व्यापाऱ्यांनी केली.

Pulses
PulsesAgrowon

कडधान्य उद्योग क्षेत्रातील संघटनांनी यासंदर्भात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाला एक पत्रही पाठवले आहे. हरभरा निर्यातीसाठी शेतकऱ्यांना १० टक्के अनुदान देण्याची मागणी या संघटनांनी पत्राद्वारे केली.

Pulses
PulsesAgrowon

देशातील हरभऱ्याचे उत्पादन वाढले आहे. हरभऱ्याचा हमीभाव (MSP) ५२.३० रुपये असताना बाजारात हरभरा ४३ रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीसाठी १० टक्क्यांचे अनुदान द्यावे, असा आग्रह निर्यातदार आणि व्यापारी संघटनांकडून धरण्यात आला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com