वासराच्या नाळेचा संसर्ग कसा रोखाल?

वासराचा जन्म झाल्यानंतर वासराची नाळ असुरक्षितरित्या कापली गेल्याने, वासराच्या बेंबीच्या ठिकाणी जंतुसंसर्ग होत असतो.
calf
calfAgrowon
Published on
Agrowon

वासराचा जन्म झाल्यापासून ते सहा महिन्याचे होईपर्यंतचा काळ त्याच्या निरोगी वाढीसाठी महत्त्वाचा असतो. या काळात वासराच्या व्यवस्थापनात दुर्लक्ष केल्यास वासराच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.

Agrowon

वासराची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास, वासराला विविध आजारांची बाधा होण्याची शक्यता असते. वासराची वाढ योग्य प्रकारे न झाल्यास ते लवकर वयात येऊन उत्पादनक्षम होण्यास विलंब लागतो.

Agrowon

अपुरा किंवा अतिरिक्त आहार यामुळे वासरांची पचनशक्ती बिघडते. वासराचा जन्म झाल्यानंतर वासराची नाळ असुरक्षितरित्या कापली गेल्याने, वासराच्या बेंबीच्या ठिकाणी जंतुसंसर्ग होत असतो.

Agrowon

वासराच्या बेंबीला सूज येणे. वासराच्या जन्मानंतर ज्या भागात नाळ लोंबकळत असते, तो भाग म्हणजे बेंबी. काही वेळेस या भागाला संसर्ग होऊन सूज येते, परिणामी त्यामध्ये पू होतो.

Agrowon

उत्कृष्ट व्यवस्थापनातून वासराच्या मरतुकिचे प्रमाण १० टक्क्यापेक्षा कमी करता येते. वासराचा जन्म झाल्यानंतर नाळ कापण्यासाठी निर्जंतुक सीझरचा वापर करावा. नाळ कापल्यानंतर ती टिंक्चर आयोडीन मध्ये बुडवून घ्यावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com