उष्णतेच्या लाटेतही तगेल गव्हाचे 'हे' वाण

हवामान बदलासोबतच सरकारला अन्न सुरक्षेचेही आव्हान पेलायचे आहे. अशा परिस्थितीत पिकाची बदलत्या हवामानात तग धरून राहणारी वाणे विकसित करणे गरजेचे झाले आहे.
उष्णतेच्या लाटेतही तगेल गव्हाचे 'हे' वाण
Pusa AhilyaAgrowon
Published on
Pusa Ahilya
Pusa AhilyaAgrowon

मार्च महिन्यातील उष्णतेच्या लाटेमुळे यंदा देशातील गहू उत्पादनात मोठी घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संशोधकांनी गव्हाचे उष्णतेला प्रतिकारक म्हणजे उच्च तापमानातही तग धरु शकणारे वाण विकसित केले आहे.

Wheat
Wheat Agrowon

'एचआय १६३४' (पुसा अहिल्या) असे या वाणाचे नाव आहे. पश्चिमेकडील राजस्थान, गुजरात तसेच मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यासाठी या वाणाची शिफारस करण्यात आली आहे. तीन वर्ष उत्पादन चाचण्या घेतल्यानंतर 'पुसा अहिल्या' पुढील हंगामात संबंधित राज्यांमध्ये प्रसारित केले जाणार आहे.

Indian Wheat
Indian WheatAgrowon

आयसीएआरच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर किंवा जानेवारीतही 'पुसा अहिल्या' वाणाची लागवड करता येते. हे वाण अवघ्या १०० दिवसांत तयार होते. म्हणजे मार्च महिन्यात पीक हातात येते. साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान गहू लागवड होते आणि मार्च-एप्रिलमध्ये कापणी केली जाते.

Wheat Production
Wheat ProductionAgrowon

एचआय १६३४' किंवा 'पुसा अहिल्या' हे वाण कमी कालावधीत तयार होणारे वाण असल्यामुळे जे शेतकरी डिसेंबर अथवा जानेवारी महिन्यात बटाटा किंवा अन्य पिकानंतर लागवड करणार आहेत, त्यांच्यासाठी हे वाण उत्तम पर्याय असल्याचे मध्य प्रदेशातील आयसीएआरच्या भारतीय तेलबीया संशोधन संस्थेतील संशोधक दिव्या अंबाती यांनी सांगीतले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com