शेळ्यांचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन

उन्हाळ्यात शेळ्यांना पोषक घटकांच्या अभावी अनेक आजार होत असतात. उन्हाळ्यात शेळ्यांचे वजन कमी होणे, उष्माघात तसेच मांस उत्पादनात घट यांसारख्या समस्या दिसून येतात. या अडचणी टाळण्यासाठी उन्हाळ्यात शेळ्यांच्या आहाराचे आणि आरोग्याचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे.
शेळ्यांचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन
शेळ्यांचे उन्हाळ्यातील व्यवस्थापनAgrowon
Published on
शेळ्यांची चरण्याची वेळ
शेळ्यांची चरण्याची वेळAgrowon

उन्हाळ्यामध्ये ११ ते ४ या दिवसाच्या काळात भरपूर ऊन असते. उन्हामुळे शेळ्यांमध्ये उष्माघाताचे प्रमाण वाढू शकते.

शेळ्यांचा आहार
शेळ्यांचा आहारAgrowon

शेळ्यांना झाडपाल्याची जास्त गरज असते. शेळ्यांना दररोज पाच किलो हिरवा चारा, एक किलो वाळलेल्या चाऱ्याची आवश्‍यकता असते.

उन्हाळ्यात गोठ्यात घ्यायची काळजी
उन्हाळ्यात गोठ्यात घ्यायची काळजीAgrowon

उन्हाळ्यात शेळ्यांना गोठ्यात पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे गोठ्यातील तापमानात जास्त वाढ होणार नाही. गोठ्याभोवती उंच सावली देणारी झाडे असल्यास गोठ्यातील व गोठ्याभोवतीचे वातावरण थंड राहते.

उन्हाळ्यामध्ये शेळ्यांची वाहतूक
उन्हाळ्यामध्ये शेळ्यांची वाहतूकAgrowon

उन्हाळ्यामध्ये शेळ्यांची वाहतूक कमीत कमी अंतरावर करावी. ट्रकमध्ये शेळ्या वाहून नेताना वाहनामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. वाहतूक शक्यतोसकाळी लवकर किंवा संध्यकाळी करावी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com