पुढच्या हंगामातील अंदाजाबाबत सरकारची सावधगिरी

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतातील ऊस लागवडीचे क्षेत्र यावर्षी २ टक्क्यांनी वाढले आहे. २ जूनपर्यंत ४६.६७ लाख हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ४५.८१ लाख हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड करण्यात आली होती.
Sugar Production
Sugar ProductionAgrowon
Published on
Sugarcane
SugarcaneAgrowon

यंदाच्या साखर हंगामातील विक्रमी साखर उत्पादनामुळे २०२२-२०२३ च्या हंगामातील साखर उत्पादनाबाबतही केंद्र सरकार आशावादी आहे. मात्र तरीही सरकारकडून सावध भूमिका घेतली जात आहे.

Sugar Stock
Sugar StockAgrowon

साखर आयुक्तालयांनी दिलेली माहिती आणि साखर उद्योग क्षेत्रातील संघटनांनी वर्तवलेल्या विक्रमी अंदाजानंतरही केंद्र सरकारकडून पुढच्या हंगामातील साखर उत्पादनाबाबत सावध भूमिका घेतली जात आहे. प्रमुख साखर उत्पादक राज्यांसोबतची बैठक पार पडूनही सरकारने पुढच्या हंगामातील साखर उत्पादनाचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक केलेला नाही.

Sugarcane
SugarcaneAgrowon

या हंगामाप्रमाणेच पुढच्या साखर हंगामातही साखरेचे वाढीव उत्पादन होईल, या गृहीतकाच्या आधारे साखर उद्योग क्षेत्राने सरकारकडे केलेल्या १ दशलक्ष टन अतिरिक्त साखरेच्या निर्यातीची मागणी सरकारने मान्य केली नाही.

Sugar
SugarAgrowon

बुधवारी (१५ जून) केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीतही साखर उद्योगाने सरकार अतिरिक्त साखर निर्यातीला परवानगी कधी देणार? या मागणीबाबत विचारणा केली. केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यावर भाष्य करण्यास नकार दिला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com