महाॲग्रिटेक प्रकल्पाला तीन वर्षांची मुदतवाढ

राज्यातील पीक लागवडीचे अचूक मापन करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महाॲग्रिटेक (Mahaagritech) प्रकल्पाला तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाॲग्रिटेक प्रकल्पाला तीन वर्षांची मुदतवाढ
DroneAgrowon
Published on

उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाच्या (Drone Technology) साह्याने राज्यातील पीक लागवडीचे अचूक मापन करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महाॲग्रिटेक (Mahaagritech) प्रकल्पाला तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

३० कोटी रुपयांची मान्यताही देण्यात आली आहे. २०२५ पर्यंत हा प्रकल्प सुरू राहील. हा प्रकल्प आता राज्य सरकारच्या महा-आयटीच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.

यासाठी हैदराबाद येथील नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरशी सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

राज्यात २०१९-२० मध्ये खरीप आणि रब्बी हंगामासाठी महाॲग्रिटेक प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत दोन्ही हंगामांतील पीकनिहाय क्षेत्र निश्‍चित करण्यासाठी सॅटेलाइट आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो.

याद्वारे लागवड, रोग, किडी आणि काढणीपश्‍चात येणाऱ्या उत्पादनाचे अनुमान काढणे अपेक्षित आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com