जनावरांना दिल्या जाणाऱ्या पाण्याची प्रत तपासा !

जनावरांच्या वाढीसाठी, शारीरिक क्रियांसाठी तसेच दूध उत्पादनासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. खाल्लेल्या चाऱ्याचे पचन योग्यप्रकारे होण्यासाठी, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याची गरज असते.
Rainy Season Water Management of  Cow
Rainy Season Water Management of CowAgrowon
Published on
Agrowon

जनावरांच्या आहारात चारा, खाद्य आणि क्षार-मिश्रणाप्रमाणे पाण्याचेही महत्त्व तितकेच आहे. जनावरांच्या वाढीसाठी, शारीरिक क्रियांसाठी तसेच दूध उत्पादनासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते.

Agrowon

खाल्लेल्या चाऱ्याचे पचन योग्यप्रकारे होण्यासाठी, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याची गरज असते. जनावरांची पाण्याची गरज हवामानानुसार, शारीरिक अवस्थेनुसार बदलत असते.

Agrowon

चाऱ्याचे योग्यरीत्या पचन होण्यासाठी जनावरांच्या तोंडातील लाळ आणि पोटातील पाचक द्रव्य चाऱ्यामध्ये मिसळणे आवश्‍यक असते. चाऱ्यातील पचन झालेले घटक रक्तामार्फत शरीरभर पोचवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.

Agrowon

जनावरांच्या शरीरात जवळपास ७० ते ८० टक्के पाण्याचे प्रमाण असते. शरीरातील विविध स्त्राव तयार होण्यासाठी पाण्याची गरज असते. हिरव्या चाऱ्यातूनही जनावरांना काही प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत असतो.

Agrowon

पाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होऊन, रक्त घट्ट बनते. परिणामी रक्ताभिसरण क्रियेत अडथळा निर्माण होतो. जनावरांची प्रजनन क्षमता ढासळते.

Agrowon

पावसाळ्यात जनावरांना पाणी पिण्यासाठी वापरले जाणारे पाण्याचे हौद किंवा टाकी अस्वच्छ असल्यास जनावरांना रोग जंतूंची लागण होण्याची शक्यता असते त्यामुळे पाण्याची टाकी स्वच्छ धुऊन, वाळवून त्यामध्ये चुना लावून घ्यावा.

Agrowon

जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नसल्यास गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी पाण्यात तुरटी फिरवावी. एक किलो शुष्क खाद्य पचवण्यासाठी चार ते पाच लिटर पाण्याची आवश्यकता असते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com