या धारेत असते ‘fat’चे प्रमाण जास्त!

सर्वसाधारणपणे पशुपालकांकडे असणाऱ्या गायी-म्हशीं जास्त दुधाचे उत्पादन देत असल्यास, त्यातील फॅटचे प्रमाण कमी असते.
milk fat
milk fat Agrowon
Published on
Agrowon

जनावरांना दिला जाणारा चारा निकृष्ट प्रतीचा असल्याने जनावरांच्या दूध उत्पादनाबरोबर दुधातील फॅटचे प्रमाणही कमी झालेले दिसून येते.

Agrowon

सकाळी सहा वाजता धार काढल्यास, सायंकाळी सहा वाजताच धार काढावी. दोन धारेतील अंतर वाढविल्यास, दुधाचे प्रमाण वाढते मात्र, फॅटचे प्रमाण कमी होते. दिवसातून दोनदा धार काढत असल्यास, दोन धारेतील अंतर १२ तासांचे असावे.

Agrowon

कासेतील पूर्ण दूध सात मिनिटामध्ये काढून घ्यावे. काही वेळेस घाई-गडबडीत धार काढताना शेवटचे दूध पिण्यास वासराला सोडले जाते. दुधातील फॅटची घनता दुधापेक्षा कमी असल्याने, फॅट दुधावर तरंगत राहते. हे तरंगणारे फॅट शेवटच्या धारेद्वारे बाहेर येत असते. म्हणून शेवटच्या धारेतील दुधाचे प्रमाण सर्वाधिक असल्याने, पूर्ण दूध काढून घेणे महत्त्वाचे आहे.

Agrowon

धार काढणाऱ्या व्यक्तीसोबतच जिथे धार काढली जाते, त्या जागेची स्वच्छताही महत्त्वाची असते. जनावरांना दगडीसारखे कासेचे आजार होणार नाहीत, याची विशेष काळजी घ्यावी.

Agrowon

दुधाळ जनावरांच्या रोजच्या आहारात ३० ते ५० ग्रॅमपर्यंत क्षार-मिश्रणाचा समावेश करावा. २० लिटरच्या पुढे दुधाचे उत्पादन देणाऱ्या जनावरांमध्ये क्षार-मिश्रणांचे प्रमाण वाढवीत न्यावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com