शेळ्यांची कोणती जात पाळावी?

शेळीपालन व्यवसाय करताना, ठराविक उद्दिष्ट समोर असले पाहिजे. उद्दिष्ट असल्याने त्यानुसार व्यवस्थापन करणे सोयीचे जाते. त्यानुसार शेळीची आणि बोकडाची निवड करणे सोयीचे जाते.
शेळ्यांची कोणती जात पाळावी?
Goat Breed Selection Criteria Agrowon
Published on
Agrowon

आपल्याकडे शेळीपालन प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी केलं जाते. त्यासोबतच सध्या शेळीपालन दूध उत्पादनासाठीही केलं जाते.

Agrowon

मांस उत्पादनासाठी शेळीपालन करायचे झाल्यास, जास्तीत जास्त जुळे किंवा तिळे देणारी शेळी निवडावी. जन्मतः जास्त वजन देणारी करडे असावीत.

Agrowon

पश्चिम महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यात मांस उत्पादनासाठी उस्मानाबादी शेळी पाळली जाते. संगमनेरी शेळी नगर, नाशिक आणि पुणे या पट्ट्यात दिसून येते. संगमनेरी शेळीचे संगोपन मांस उत्पादनाबरोबर दूध उत्पादनासाठी ही केले जाते.

Agrowon

विदर्भातील अतिउष्ण वातावरणात टिकून राहून चांगली वजनवाढ देणारी शेळी, अशी ओळख आहे, बेरारी शेळीची. जास्त पावसाच्या प्रदेशात, जंगलांमध्ये चरून स्वतःचे पालन पोषण करणारी कोकण कन्याळ कोकणात आढळून येते.

Agrowon

शेळीपालनाचा व्यवसाय करताना तेथील स्थानिक प्रजातींचा विचार प्रामुख्याने करायला हवा. जगभरात शेळ्या-मेंढ्यांच्या अनेक जाती आढळून येतात. या जाती हजारो वर्षे त्याच वातावरणात राहिल्यानं, स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये तयार झालेली दिसून येते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com