का रोडावली सरकारी गहू खरेदी?

खुल्या बाजारात गव्हाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी यंदा सरकारी खरेदी केंद्रांऐवजी खाजगी व्यापाऱ्यांना पसंती दिली. पर्यायाने सरकारी खरेदी केंद्रांवरील आवक घटली आहे.
का रोडावली सरकारी गहू खरेदी?
Wheat ProcurementAgrowon
Published on
Wheat Procurement
Wheat Procurement Agrowon

गेल्या वर्षीच्या गहू खरेदीच्या तुलनेत यंदा ४८ टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे भारतीय अन्न महामंडळास केंद्राच्या सुधारित अंदाजाएवढीही (१९५ लाख टन) गहू खरेदी करणे अवघड होणार आहे.

Wheat Procurement
Wheat ProcurementAgrowon

सरकारच्या आकडेवारीनुसार ११ मे अखेरीस चालू हंगामातील सरकारी गहू खरेदी १७८ लाख टनांपर्यंत आली आहे. गेल्यावर्षी ३४१ लाख टन गहू खरेदी करण्यात आला होता.

Wheat Procurement
Wheat ProcurementAgrowon

गहू खरेदीतील सध्याचा ट्रेंड आणखी काही आठवडे सुरु राहिला तर सुधारित अंदाजानुसार अपेक्षित १९५ लाख टन गहू खरेदीचे उद्दिष्टही गाठणे शक्य होणार नाही.

Wheat Procurement
Wheat ProcurementAgrowon

सरकारने आपल्या प्राथमिक अंदाजात ४४४ लाख टन गहू खरेदीचे उद्दिष्ट जाहीर केले होते. शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांना गहू विकणे पसंत करत असल्यामुळे सरकारी खरेदीत घट झाल्याचे कारण सरकारने दिले होते.

Wheat Procurement
Wheat ProcurementAgrowon

बाजारातील गव्हाची आवक यंदा १ लाख टनांपर्यंत घटली आहे. गेल्या वर्षी दिवसाकाठी बाजारात ४ लाख टन गव्हाची आवक होत होती. २०२१ च्या एप्रिलमध्ये बाजारात ७.४ लाख टन गहू बाजारात दाखल झाला होता.

Wheat Procurement
Wheat ProcurementAgrowon

अगदी केंद्र सरकारला ज्या तिन राज्यांतील गहू उत्पादनाचा भरोसा वाटत होता, त्या उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशातील दैनंदिन आवकही मोठ्या प्रमाणात घटली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.