खरेदी केंद्रांवर गहू खरेदीची लगबग !

केंद्र सरकारने केलेल्या या हंगामातील आतापर्यंतच्या गहू खरेदीपैकी ३२,१६,६६८ टन गहू पंजाबमधून (Punjab) खरेदी करण्यात आला आहे. हरियाणातून (Haryana) २७,७६,४९६ टन, मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) ८,९८,६७९ टन गहू खरेदी करण्यात आला आहे.
Wheat Procurement
Wheat ProcurementAgrowon
Published on
Wheat Procurement
Wheat ProcurementAgrowon

केंद्र सरकारने या रब्बी हंगामात शेतकऱ्यांकडून आतापर्यंत ६९.२४ लाख टन गहू (Wheat) खरेदी केला आहे. हमीभावाने (MSP) खरेदी करण्यात आलेल्या या गव्हापोटी १४ हजार कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.

Wheat Procurement
Wheat ProcurementAgrowon

रब्बी विपणन हंगाम २०२२-२०२३ साठी सध्या मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, चंदीगड येथे गव्हाची हमीभावाने (MSP) खरेदी सुरु आहे.

Wheat Procurement
Wheat ProcurementAgrowon

२०२१-२०२२ या आर्थिक वर्षात देशभरात गव्हाचे उत्पादन विक्रमी अशा १११.३२ दशलक्ष टनांवर जाईल, असा अंदाज फेब्रुवारीमध्ये केंद्रीय कृषी मंत्रालयाने व्यक्त केला होता.

Wheat Production
Wheat ProductionAgrowon

२०२१-२०२२ च्या रब्बी हंगामात ३४३.२ लाख हेक्टर क्षेत्रात गव्हाची लागवड करण्यात आली. २०२०-२०२१ च्या रब्बी हंगामात ३४६.०९ लाख हेक्टर क्षेत्रात गव्हाची लागवड करण्यात आली होती.

Wheat Production
Wheat ProductionAgrowon

२०२०-२०२१ मध्ये देशाचे गहू उत्पादन १०९.५९ दशलक्ष टन होते. चालू आर्थिक वर्षात सरकारने ११० दशलक्ष टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले होते.

Wheat Production
Wheat ProductionAgrowon

यंदा मध्य प्रदेश, बिहारमधील गहू लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे नोंदवण्यात आले, तर पंजाब, राजस्थान, हरियाणात गहू लागवड क्षेत्रात घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

Wheat Production
Wheat ProductionAgrowon

केंद्र सरकारने यंदा गव्हाला २०१५ रूपये प्रति क्विंटल असा हमीभाव (MSP) जाहीर केला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com