Food Crisis: तांदूळ उत्पादनातील घटीमुळे खाद्य संकटात भर?

रशिया-युक्रेन संघर्षामुळे जागतिक बाजारात गहू (Wheat) आणि मक्याच्या (Maize)किंमतींत वाढ झाली. जगातील अनेक देशांत अन्नसंकट (Food Crisis) निर्माण झाले आहे. भारतीय तांदळाचे (Rice) उत्पादन घटल्यास हे संकट अधिकच गडद होण्याची चिन्हे आहेत.
Food Crisis
Food CrisisAgrowon
Published on
Rice
RiceAgrowon

भारतात भात लागवड घटल्यामुळे जागतिक अन्न संकटात भर पडण्याची शक्यता आहे. जगातील एक प्रमुख भात उत्पादक देश म्हणून भारताकडे बघितलं जातं. बांगलादेश, चीन, नेपाळ, मध्य पूर्वेतील देशांसह सुमारे १०० देशांना भारताकडून तांदूळ पुरवण्यात येतो.

Food Crisis
Food CrisisAgrowon

अनेक देशांची अन्नसुरक्षा भारताच्या तांदळावर अवलंबून आहे. मात्र यावर्षी मॉन्सूनच्या सुरूवातीच्या टप्प्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे भाताचे क्षेत्र घटले. गेल्या तीन वर्षांतील सगळ्यात कमी भात लागवड यंदा झाली. त्यामुळे तांदूळ उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत.

Paddy Cultivation
Paddy CultivationAgrowon

जागतिक बाजारात धान्याच्या किंमती वाढत असताना भारतात तांदूळ उत्पादन घटण्याच्या शक्यतेने चिंता वाढली आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा यांसारख्या प्रमुख तांदूळ उत्पादक राज्यांत पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे देशातील एकूण भात लागवड क्षेत्रात आतापर्यंत १३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली.

Rice Stock
Rice StockAgrowon

बांगलादेशातून तांदळाची मागणी वाढली आहे. सध्या वाहतूक खर्चासह प्रति टन ३६५ डॉलर दराने तांदूळ निर्यात होत आहे. सप्टेंबर अखेरीस निर्यात दर प्रति टन ४०० डॉलरवर पोहचण्याची शक्यता आहे. देशांतर्गत बाजारातही तांदूळ उत्पादनातील संभाव्य घटीचे पडसाद उमटले आहेत. तांदळाचे काही प्रकार १० टक्क्यांनी महागले आहेत.

Rice Production
Rice ProductionAgrowon

भारताच्या तांदूळ उत्पादन घटले तर देशांतर्गत महागाईसोबत दोन हात करणे अवघड जाणार आहे. याशिवाय निर्यातीवरही मर्यादा येणार असल्याची भीती व्यापारी सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

Rice
RiceAgrowon

भारतातील तांदूळ उत्पादनाचे भवितव्य आता येत्या दोन महिन्यांतील पावसावर अवलंबून आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सरासरी पाऊस होऊन भात लागवडीतील घट भरून निघेल, असा आशावाद काही कृषी शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com