मुंबईत अजित पवार यांच्याहस्ते तांदुळ महोत्सवाचे उद्घाटन 

राज्यभरातील तांदूळ व धान उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ थेटपणे उपलब्ध व्हावी आणि शहरी नागरिकांना विविध प्रकारच्या तांदळाच्या खात्रीशीर वाणांची एकाच ठिकाणी किफायतशीर किमतीत वर्षभराच्या तांदळाची एकदम खरेदी करता यावी या व्यापक उद्देशातून हा तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
rice-exhibition
rice-exhibition

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड आणि ग्रोव्हर्स डायरेक्ट इंडिया लिमिटेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र तांदूळ महोत्सवाचे (Maharashtra Rice exhibition) उद्घाटन गुरुवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि संबंधित कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

व्हिडीओ पहा- 

दिनांक १७, १८, १९ फेब्रुवारी या तीन दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ७ यादरम्यान यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हे तांदूळ प्रदर्शन नागरिकांसाठी खुले असणार आहे.  महाराष्ट्रातील अनेक शेतकरी संस्थांमार्फत वेगवेगळ्या वाणांचे सुमारे ४० प्रकारचे तांदूळ येथे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

ठाणे व पालघरचा वाडा कोलम , मावळ व मुळशीचा इंद्रायणी आणि आंबेमोहोर, आजऱ्याचा घनसाळ, चंद्रपूर व विदर्भातील श्रीराम कोलम, अकोले व नाशिक येथील आदिवासी भागातून पिकवण्यात आलेला ब्लॅक, रेड, ब्राउन राईस इत्यादी पारंपरिक तसेच संशोधित तांदळाचे विविध प्रकार या प्रदर्शनात उपलब्ध आहेत.

विविध प्रकारच्या तांदूळ वाणांबद्दल जागरूकता निर्माण होऊन आणि या वाणांची मागणी उत्तरोत्तर वाढून त्याचा दिर्घकालीन लाभ तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

राज्यभरातील तांदूळ व धान उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ थेटपणे उपलब्ध व्हावी आणि शहरी नागरिकांना विविध प्रकारच्या तांदळाच्या खात्रीशीर वाणांची एकाच ठिकाणी किफायतशीर किमतीत वर्षभराच्या तांदळाची एकदम खरेदी करता यावी या व्यापक उद्देशातून हा तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या अर्ध पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर या तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन केले. नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक स्टॉलवर जाऊन तांदूळ वाणाची माहिती, तांदूळ कसा व किती रुपयांनी विक्री करणार आहात याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेतली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com