पशुपालन क्षेत्रात गुंतवणुकीची गरज

पशुधन व्यवसायात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राकडून मर्यादित गुंतवणूक असूनही शाश्वत वाढ दिसून येतीय. या क्षेत्रात उत्पन्न वाढ, रोजगार निर्मिती आणि महिलांसह गरीब आणि उपेक्षित लोकसंख्येचे सक्षमीकरण करण्याची प्रचंड क्षमता आहे.
Increase in consumption of livestock products
Increase in consumption of livestock products

भारतीय कृषी-अन्न व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाच क्षेत्र म्हणून पशुधन उदयास येत आहे. जनावरांपासून मिळणार उत्पादिते म्हणजेच दूध, दुग्धजन्य पदार्थ, मांस आणि अंडी यांचा वापर वेगाने वाढत आहे. देशातील एकूण कृषी उत्पादनातील पशुधनाचा वाटा 30 टक्के इतका आहे.  

बिझनेस लाईन या इंग्रजी वृत्तानुसार आजच्या घडीला उत्पादन आणि मूल्याच्या दृष्टीने दूध ही भारतातील सर्वात मोठी कृषी वस्तू आहे. सन 2019-20 मध्ये, सर्व धान्ये आणि कडधान्ये मिळून 4.5 लाख कोटींच्या तुलनेत एकट्या दुधाचे मूल्य सुमारे 8 लाख कोटी इतकं होत. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राकडून मर्यादित गुंतवणूक असूनही शाश्वत वाढ दिसून येतीय. या क्षेत्रात उत्पन्न वाढ, रोजगार निर्मिती आणि महिलांसह गरीब आणि उपेक्षित लोकसंख्येचे सक्षमीकरण करण्याची प्रचंड क्षमता आहे.

 हेही पाहा-

या क्षेत्रामुळे 8.8 टक्के लोकसंख्येला रोजगार मिळतोय. ग्रामीण भागातील दोन तृतीयांश लोकांच्या उपजीविकेचं साधन आहे. या क्षेत्रात बहुतांशी महिला गुंतलेल्या आहेत. यामुळे पशुधन क्षेत्राला बळकटी देण म्हणजे ग्रामीण भारताला समृद्ध करणे होय.

पशुधन क्षेत्राला भेडसावणाऱ्या प्रमुख अडचणी म्हणजे चाऱ्याची टंचाई, त्वरित पशुवैद्यकीय सेवा नसणे, कमी पुनरुत्पादन क्षमता, उशिरा वयात येण्याची समस्या, उच्च वंशावळीच्या वळूची उपलब्धता नसणे, लस आणि निदानाची कमतरता आणि क्षेत्रीय स्तरावरील जनावरांच्या प्रजननाच्या अडचणी होय.

National Academy of Agricultural Science ने 2022-23 च्या बजेटमध्ये चारा, आरोग्य आणि प्रजनन या तीन प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रित करून पशुधन विकासासाठी सर्वसमावेशक कार्यक्रम असावा असा प्रस्ताव मांडलाय.

हेही पाहा-

सर्वप्रथम जनावरांच पुनरुत्पादन आणि उत्पादकता सुधारण्यासाठी चांगल्या चाऱ्याची उपलब्धता हवी. भारतात सध्या कोरड्या आणि हिरव्या चाऱ्याची अनुक्रमे १२ आणि ३० टक्के कमतरता आहे. जनावरांपासून मिळणाऱ्या उत्पादनांच्या वाढत्या मागणीसह, चाऱ्याची मागणीही वाढत आहे. परंतु गेल्या अनेक दशकांमध्ये चारा लागवडीखालील क्षेत्र नऊ दशलक्ष हेक्टरवर स्थिरावले आहे, जे एकूण लागवडी योग्य जमिनीच्या ४.६ टक्के आहे.

चाऱ्याच्या सुधारित जातींचे बियाणे उपलब्ध नसल्याने, भारतात अन्नधान्याच अतिरिक्त उत्पादन आहे पण चाऱ्याची टंचाई आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, चारा बियाणे बँकांसह चारा बियाणे गावे विकसित करण्याची गरज आहे. पशुधन क्षेत्राला बळकटी दिल्याने फक्त जनावरांपासून मिळणाऱ्या उत्पादनांची वाढती मागणी पूर्ण होणार नाही तर शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल, रोजगार निर्मिती होईल, महिलांचे सक्षमीकरण होईल आणि पशुधन-आधारित प्रक्रिया क्षेत्रांना चालनाही मिळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com