भारत ठरला काकडीचा सर्वात मोठा निर्यातदार 

भारत जगात काकडीची निर्यात करणारा सर्वात मोठा निर्यातदार ठरला आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०२० -२१ या काळात भारताने जगात काकडी आणि खिरी काकडीची एक लाख २३ हजार ८४६ मेट्रिक टन निर्यात झाली आहे
Cucumber Export
Cucumber Export

पुणे - भारत जगात काकडीची (Cucumber) निर्यात (Export) करणारा सर्वात मोठा निर्यातदार ठरला आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०२० -२१ या काळात भारताने जगात काकडी आणि खिरी काकडीची (Kheera Cucumber) एक लाख २३ हजार ८४६ मेट्रिक टन निर्यात झाली आहे. रुपयांच्या स्वरुपात पाहायचं झालं तर जवळजवळ ११४ दक्षलक्ष डॉलर्सची एवढे याचे मूल्य आहे.

भारताने गेल्या आर्थिक वर्षात, कृषी प्रक्रिया उत्पादने, लोणच्याची काकडी अशा पदार्थांच्या उत्पादनांची २०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक मूल्यांची निर्यात केली. जगभरात काकडी आणि लोणच्याची काकडी (Pickel Cucumber) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कृषिमालात देशाच्या निर्यातीत वाढ केली आहे.

२०२०-२१ या वर्षात भारताने  दोन लाख २३ हजार ५१५ मेट्रिक टन काकडीची म्हणजेच २२३ दशलक्ष डॉलर्स मूल्यांच्या काकडीची निर्यात केली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील वाणिज्य विभागाच्या निर्देशांनुसार कृषी आणि अन्नप्रक्रिया निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) (APEDA) ने पायाभूत विकास, जागतिक बाजारात उत्पादन प्रोत्साहन देण्याबाबत अनेक उपक्रम राबवले आहेत. त्याशिवाय, अन्नप्रक्रिया केंद्रात अन्न सुरक्षा व्यवस्थापनाच्याही उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com