उन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन देणार

तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर होण्यासह शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळावे, म्हणून भारत उन्हाळी पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले.
Summer Crop
Summer Crop

तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (Aatmnirbhar) होण्यासह शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळावे, म्हणून भारत उन्हाळी पिकांना (Summer Crop) प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले. केंद्र सरकारने प्रामुख्याने कडधान्ये, (Pulses) तेलबिया, (Oil Seed) आणि भरडधान्य (Coars Cerals) यासारख्या उन्हाळी पिकांच्या लागवडीसाठी विविध कार्यक्रमांद्वारे पुढाकार घेतल्याचे तोमर यांनी सांगितले.

२०२१-२२ च्या उन्हाळी हंगामासाठी (Summer Season) कृषिसंबंधी राष्ट्रीय परिषदेत गुरूवारी (ता.२७) बोलताना तोमर म्हणाले की, उन्हाळी पिके केवळ अतिरिक्त उत्पन्नच देत नाहीत तर शेतकऱ्यांसाठी रब्बी आणि खरीप हंगामादरम्यान रोजगाराच्या संधीही निर्माण करून उत्पादनही वाढवतात. कडधान्ये, भरड धान्ये, पोषक तृणधान्ये आणि तेलबिया यांसारख्या उन्हाळी पिकांच्या लागवडीसाठी सरकारने विविध कार्यक्रमांद्वारे नवीन उपक्रम हाती घेतले आहेत.

उन्हाळी हंगामातील निम्म्याहून अधिक क्षेत्र कडधान्ये, तेलबिया, आणि भरड धान्याखाली असले तरी सिंचनाचे स्रोत असलेले शेतकरी उन्हाळी हंगामात भात आणि भाजीपाला या सारखी पिके घेतात. भातासह उन्हाळी पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र २०२१७-१८ मधील २९.७१ लाख हेक्टर वरून २.७ पटीने वाढून २०२०-२१ मध्ये ८०.४६ लाख हेक्टर झाल्याचे तोमर यांनी यावेळी सांगितले. मागील पीक हंगामातील पीक कामगिरीचा आढावा आणि मूल्यांकन करणे आणि राज्य सरकारांशी सल्लामसलत करून उन्हाळी हंगामासाठी पीकनिहाय लक्ष्य निश्चित करणे हा या परिषदेचा उद्देश होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com