भारतीय लष्कराची शेतकऱ्यांप्रती अशीही 'सद्भावना'

पूंछ जिल्ह्यातील सेक्लु गावात भारतीय लष्करातर्फे एक पॉली हाऊस (Poly House) उभारण्यात आलंय. 'मिशन सदभावना' या नावानं भारतीय लष्करानं हा उपक्रम राबवलाय.
Indian Army Constructs Poly House in Poonch
Indian Army Constructs Poly House in Poonch

देशाच्या सीमांचे रक्षण करणारे भारतीय लष्कराचे जवान शेतकऱ्याला आधुनिक शेतीबद्दल मार्गदर्शन करताहेत, असं म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र हे प्रत्यक्षात घडतं आहे, जम्मू काश्मीरमधील पूंछ इथं . 

पूंछ इथल्या भारतीय लष्करानं स्थानिक शेतकऱ्यांसाठी एक भलं मोठं पॉली हाऊस (Poly House) उभारलंय. या पॉली हाऊसमध्ये (Poly House) स्थानिक शेतकरी विविध प्रकारचं उत्पादन घेऊ शकणार आहेत. त्यासाठी त्यांना योग्य ते मार्गदर्शनही करण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलीय. 

पूंछ जिल्ह्यातील सेक्लु गावात भारतीय लष्करातर्फे एक पॉली हाऊस (Poly House) उभारण्यात आलंय. 'मिशन सदभावना' या नावानं भारतीय लष्करानं हा उपक्रम राबवलाय.  जम्मू काश्मीरमधील तापमानाचा विचार करता स्थानिक शेतकऱ्यांना हवामानाशी जुळवून घेत तशीच पिके घ्यावी लागतात. याचा विचार करून हे हाऊस उभारण्यात आलय. गावकरी आता सर्व प्रकारच्या हवामानात उगवू शकणाऱ्या भाज्यांचं उत्पादन पॉली हाऊसमध्ये (Poly House) घेऊ शकणार आहेत.

फलोत्पादन विभागाकडून या शेतकऱ्यांना बियाणं उपलब्ध करून देण्यात आलंय. लष्कराचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून हजारो गरीब शेतकरी आता त्यांना हव्या त्या शेतमालाचा, विशेषतः भाजीपाल्याचं उत्पादन या हाऊसमध्ये घेऊ शकणार आहेत.

बाहेरील हवामानाचा या उत्पादन प्रक्रियेवर कसलाच परिणाम होणार नसल्याचं जिल्हा फलोत्पादन अधिकारी सत्वर सिंग यांनी माध्यमांशी बोलताना नमूद केलं आहे. अगदी बर्फवृष्टीच्या काळातही शेतकरी निश्चित असं उत्पादन घेऊ शकणार आहेत. स्थानिक शेतकऱ्यांनी भारतीय लष्कराबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त केली असल्याचं सिंग यांनी सांगितलंय.  

व्हिडीओ पहा 

अक्रम नावाच्या एका स्थानिक शेतकऱ्यानं पॉली हाऊस (Poly House) उभारण्यासाठी भारतीय लष्कराला स्वतःची जागा उपलब्ध करून दिलीय. तसंच शेतीकामासाठी या पॉली हाऊसचा (Poly House) वापर कसा करायचा ? याबाबतच मार्गदर्शनही भारतीय लष्कर आणि राज्याच्या कृषी विभागाकडून केलं जातं आहे. 

माझ्या परिसरातील शेतकरी अत्यंत गरीब आहेत. बर्फ़ाळ हवामानात जेवढं म्हणून आणि जे पिकू शकतं तेवढ्याच उत्पादनावर आमचा उदरनिर्वाह चालतो. या अवस्थेत भारतीय लष्करातर्फे उभारण्यात आलेल्या पॉली हाऊसमुळं (Poly House) आम्हाला हमखास उत्पादनाचा मार्ग उपलब्ध झाला आहे. इथं आधुनिक शेतीचं प्रशिक्षणही दिल जात असून त्यांनतर आम्ही मोठ्या उमेदीने उत्पादन घेऊ शकणार असल्याचा विश्वास अक्रम या शेतकऱ्यानं व्यक्त केलाय. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com