येत्या आर्थिक वर्षात भारताची इंधन मागणी ५.५ टक्क्यांनी वाढणार

गेल्या काही महिन्यांतील स्थैर्यानंतर आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था मानल्या जाणाऱ्या भारताच्या औद्योगिक व वाहतूक क्षेत्रातील गतीविधींमध्ये वाढ झाल्यामुले इंधनाच्या मागणीत वाढ होण्याचा केंद्र सरकारचा प्राथमिक अंदाज आहे. रॉयटर्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Fuel
Fuel

येत्या आर्थिक वर्षात (२०२२-२३) भारताच्या इंधनाच्या मागणीत (Fuel Demand) ५.५ टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज आहे. गेल्या काही महिन्यांतील स्थैर्यानंतर आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था (Asia's Third Economy) मानल्या जाणाऱ्या भारताच्या औद्योगिक व वाहतूक क्षेत्रातील गतीविधींमध्ये वाढ झाल्यामुले इंधनाच्या मागणीत (demand Of Fuel) वाढ होण्याचा केंद्र  सरकारचा प्राथमिक अंदाज आहे. रॉयटर्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सरकारी अंदाजानुसार, २०२२-२३ मध्ये भारताची इंधनाची मागणी चालू आर्थिक वर्षाच्या २०३.३ दशलक्ष टनांच्या सुधारित अंदाजावरून २४१.५ दशलक्ष टनांवर जाण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या पेट्रोलियम प्लॅनिंग अँड ॲनालिसीस (Petrolium Planing And Analysis) विभागाच्या (PPAC) संकेतस्थळावर हे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.  

प्रवासी वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गॅसोलीनची (Gaoline Demand) देशांतर्गत मागणी ७.८ टक्क्यांनी वाढून ३३.३ दशलक्ष टनांवर जाण्याची शक्यता आहे. तर गॅस ऑईलचा (Gas Oil) वापर ४ टक्क्यांनी वाढून ७९.३ दशलक्ष टनांवर येणार असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. याशिवाय हवाई वाहतुकीसाठीच्या इंधनात ५० टक्क्यांची वाढ अपेक्षित असून हा वापर ७.६ दशलक्ष टनांवर जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

कोळशाला उत्तम पर्याय असणाऱ्या पेटकोकची (Petcocke) मागणीही २.८ टक्क्यांनी वाढून १४.८ दशलक्ष टनांवर जाण्याची शक्यता आहे. तर स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजीची (LPG) मागणी ४.५ टक्क्यांनी वाढून २९.७ लाख टनांवर जाण्याचा अंदाज असल्याचे पेट्रोलियम प्लॅनिंग अँड ॲनालिसीस विभागाने नमूद केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com