सोयाबीन दराला पुन्हा उभारी

जागतीक सोयाबीन बाजारात रशिया-युक्रेन युध्दामुळं मोठी उठापटक सुरु आहे. गुरुवारी युध्दाच्या पहिल्या दिवशी सोयाबीन दरात विक्रमी तेजी होती. मात्र त्यानंतर शुक्रवारी दर नरमले.
soyabeen
soyabeen

पुणेः मागील आठवड्याचा शेवट सोयाबीन दरातील (Soybean Rate) नरमाईने झाला होता. मात्र सोमवारी आठवड्याची सुरुवात सोयाबीन दरातील सुधारणेने झाली. आंतरराष्ट्रीय बाजारासह देशातही सोयाबीन सुधारले होते. खाद्यतेलातील (Edible Oil) तेजीचा सोयाबीनला फायदा मिळतो आहे. देशात सोयाबीनचे सरासरी दर ६ हजार ५०० ते ७ हजार रुपयांपर्यंत होते. इंदोर येथे सोयाबीनला सरासरी ७ हजार रुपये दर मिळाला.

जागतीक सोयाबीन बाजारात रशिया-युक्रेन युध्दामुळं (Russia-Ukraine War) मोठी उठापटक सुरु आहे. गुरुवारी युध्दाच्या पहिल्या दिवशी सोयाबीन दरात विक्रमी तेजी होती. मात्र त्यानंतर शुक्रवारी दर नरमले. जागतीक बाजारातही सोयाबीन दर (International Soybean Market Rate) कमी झाले होते. सीबाॅटवरील वायदे विक्रमी १७५० सेंटवर पोचले होते. त्यानंतर हाच दर १५८० सेंटपर्यंत झाला होता. मात्र सोमवारी बाजार सुरु झाला तेव्हा सोयाबीन दराने पुन्हा पुर्वपातळीकडे वाटचाल सुरु केली. देशातही सोयाबीनचा दर सरासरी साडेसहा हजारांपर्यंत आला होता. तो पुन्हा सात हजारांकडे वाटचाल करत आहे. खाद्यतेलाचे (Edible Oil) दरही आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीत आहेत. सोमवारी बुर्सा मलेशिया एक्सचेंजवर कच्या पामतेलाचे वायदे ६ हजार ८०० रिंगीटवर खुले झाले. तर कमाल ७ हजार ५३० रिंगीटने व्यवहार झाले. तर सोयाबीनचे वायदेही सुधारले होते.

देशातील सोयाबीन दरातही सोमवारी सुधारणा पाहायला मिळाली. देशात सोयाबीनचे सरासरी दर ६ हजार ५०० ते ७ हजार रुपयांपर्यंत होते. इंदोर येथे सोयाबीनला सरासरी ७ हजार रुपये दर मिळाला. तर लातूर येथे सर्वसाधारण ७ हजार २२० रुपयाने व्यवहार झाले. ही परिस्थिती महत्वाच्या बाजारांत दिसून आली. राज्याचा विचार करता अकोला येथे सर्वसाधारण दर ६ हजार ६००, हिंगोली येते ६ हजार ९३० रुपये तर जालना येथे ७ हजार रुपये सर्वसाधारण दर होता.

व्हिडीओ पाहा -

शुक्रवारच्या तुलनेत बहुतेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीन दरात  सुधारणा पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात दर (International Market Rate) सुधारल्याचा परिणाम देशातील बाजारातही दिसून आला. तसेच दरात घसरण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजारातील आवकही कमी केली होती, असं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

देशातील प्लांट्सचे दर शुक्रवारी ६ हजार ७०० रुपयांपर्यंत आले होते. गुरुवारी हे दर ७ हजार ९०० रुपयांपर्यंत पोचले होते. म्हणजेच एकाच दिवसांत जवळपास १२०० रुपयाने नरमले होते. मात्र सोमवारी प्लांट्सच्या दराने उभारी घेतली. सोमवारी मध्य प्रदेशात प्लांट्सचे दर प्रतिक्विंटल ७ हजार ८०० रुपयांवर होते. तर महाराष्ट्रातही प्लांट्ने ७ हजार ८०० रुपायाने सोयाबीनची खरेदी केली.

दुपारनंतर प्लांट्च्या दरात सुधारणा झाली होती. दिवसभराचा आढावा घेता. प्लांट्सचे दर बाजार समित्यांतील दरापेक्षा ७०० ते ८०० रुपयांनी अधिक राहिले. युध्दामुळे पामतेल, सूर्यफूल तेल आणि सोयातेलाच्या दरात तेजी आली. याचा लाभ देशांतर्गत सोयाबीन बाजाराला होताना दिसतो आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com