कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक १ अब्ज डॉलर्सवर !

जगभरात २०१२ पासून २०२१ पर्यंत कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट अप्समधील गुंतवणुकीचं प्रमाण ९१.५ अब्ज डॉलर्सवर गेलेय. यातील ५१ टक्के गुंतवणूक ही गेल्या व वर्षात झालेली आहे.
investment in agritech
investment in agritech

देशभरातील कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट अप्समधील गुंतवणुकीनं या आर्थिक वर्षात १ अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केलाय. या उद्योग क्षेत्रातील जाणकारांच्या मते २०१२ सालापासून कृषी तंत्रज्ञान क्षेत्राच्या स्टार्स अप्समध्ये २.५ अब्ज डॉलर्स एवढी गुंतवणूक झालीय.          फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे (FICCI) कृषी क्षेत्रातील स्टार्ट अप्सवर आयोजित परिषदेत अॅग्री स्टार्ट अप्ससाठीच्या (Agri startups) टास्क फोर्सचे अध्यक्ष आणि भारत इनोव्हेशन फंडचे भागीदार हेमेंद्र माथूर यांनी कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट अप्समध्ये विकासाला प्रचंड मोठा वाव असल्याचं म्हटलं आहे. या आर्थिक वर्षा अखेरीस या क्षेत्रातील गुंतवणुकीचे प्रमाण २.५ अब्ज डॉलर्सचा टप्पा पार पाडेल, असा विश्वास व्यक्त केलाय.     कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट अप्स सध्या तिसऱ्या टप्पावर आहेत. शेतकरी जसे नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करतील अन कृषी व्यवसायाच्या नव्या संकल्पना प्रत्यक्षात यायला लागतील त्यावेळच्या टप्य्यात हे क्षेत्र आणखी विस्तारेल, असा विश्वास माथूर यांनी व्यक्त केलाय.  

यावेळी प्रकाशित करण्यात आलेल्या एका अहवालानुसार, जगभरात २०१२ पासून २०२१ पर्यंत कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट अप्समधील गुंतवणुकीचं प्रमाण ९१.५ अब्ज डॉलर्सवर गेलेय. यातील ५१ टक्के गुंतवणूक ही गेल्या व वर्षात झालेली आहे.       

कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीचा फ्लो अभ्यासल्यास अमेरिका, चीननंतर भारताचा क्रमांक लागतो. २०११ पर्यंत भारतातील कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात झालेली गुंतवणूक होती ४५ दशलक्ष डॉलर्स. अलीकडच्या काही वर्षांत भारतात या क्षेत्रातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना दिसते आहे. 

२०११ पर्यंत जगभरातही कृषी तंत्रज्ञानाकडे फारसे लक्ष केंद्रित करण्यात आलं नव्हतं. येत्या दशकात जगभरात १० अब्ज डॉलर्स एवढी गुंतवणूक होणे अपेक्षित असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. 

विकसित होत असलेलं तंत्रज्ञान आणि  कृषी संशोधन नित्याच्या शेतीकामात उपयोगात आणल्या जायला हवं. कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट अप्सनी उपयुक्तता, बदलत्या हवामानाशी सुसंगतता आणि उत्पादकता वाढ असे तीन हेतू साध्य करायला हवेत, असं प्रतिपादन भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक त्रिलोचन मोहपात्र त्यांनी केलाय.   

कृषी तंत्रज्ञानाला हवंय सरकारकडूनही पाठबळ 

केंद्र सरकारने ई नाम (electronic National Agriculture Market) या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून खाजगी क्षेत्रातील बाजारपेठ जोडण्याचे काम केलंय. सरकारने केवळ १ हजार खाजगी बाजारपेठा जोडल्या आहेत. मात्र येत्या काळात सरकारने आणखी १ हजार बाजारपेठा जोडायला हव्यात, असं प्रतिपादन करत एसएफएसीचे (Small Farmers’ Agribusiness Consortium) महासंचालक नीलकमल दरबारी यांनी केलेय. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com