शेतकऱ्यांच्या रोषानंतरही उत्तर प्रदेशात भाजप विजयी !

संयुक्त किसान मोर्चाच्या (Sanyukt Kisan Morcha)मिशन युपीमुळे या विभागात भाजपची धूळदाण उडेल आणि त्याचा अप्रत्यक्ष लाभ (जाट , मुस्लिम आणि यादव या तीन समूहाच्या एकत्रित समीकरणामुळे) अखिलेश यादव आणि राष्ट्रीय लोक दलाच्या जयंत चौधरींना होईल, अशी अटकळ व्यक्त करण्यात आली होती. त्यातुलनेत समाजवादी- राष्ट्रीय लोकदलाच्या आघाडीला अपेक्षित यश मिळवता आलेलं नाही.
Farm Unrest remained only in paper
Farm Unrest remained only in paper

दिल्लीतील किसान आंदोलन (Kisan Andolan),उसाची थकबाकी,वाढीव वीजबिलांसारखे स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न , संयुक्त किसान मोर्चाकडून (Sanyukt Kisan Morcha) 'मिशन युपी' (Mission UP) या नावाने करण्यात आलेला विरोधी प्रचार या सर्व पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात भाजपला सत्ता राखण्यात यश मिळाले आहे. विशेषतः पश्चिम आणि मध्य उत्तर प्रदेशात २०१७ च्या तुलनेत यावेळी भाजपच्या जागा घटल्या असल्या तरी मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे.        केंद्राच्या तीन वादग्रस्त कृषी (Three Contentious Farm Law) कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनातील पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी समूहाचा सक्रिय सहभाग, जाट समूहातील भाजपविरोधी रोष, राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात योगी सरकारला (Yogi Adityanath) आलेल्या अपयशामुळे उत्तर प्रदेशात विशेषतः पश्चिम उत्तर प्रदेशात (Western Uttar Pradesh) भाजपला मोठा फटका बसेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

संयुक्त किसान मोर्चाच्या (Sanyukt Kisan Morcha) मिशन युपीमुळे या विभागात भाजपची धूळदाण उडेल आणि त्याचा अप्रत्यक्ष लाभ (जाट , मुस्लिम आणि यादव या तीन समूहाच्या एकत्रित समीकरणामुळे) अखिलेश यादव आणि राष्ट्रीय लोक दलाच्या जयंत चौधरींना होईल, अशी अटकळ व्यक्त करण्यात आली होती. त्यातुलनेत समाजवादी- राष्ट्रीय लोकदलाच्या आघाडीला अपेक्षित यश मिळवता आलेलं नाही. 

प्रत्यक्ष निकालानंतर भाजपला शेतकऱ्यांच्या असंतोषाचा फारसा फटका बसला नसल्याचे दिसून आलय. पश्चिम उत्तर प्रदेशात २०१७ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या १९ जागा घटल्या असल्या तरी मतदानाची टक्केवारी ३९.६७ वरून ४१ .५ वर गेलीय.

व्हिडीओ पहा- 

राष्ट्रीय लोकदलाने इथे ९ जागा जिंकल्यात. त्यांच्या मतदानाची टक्केवारीही ६.६ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर गेलीय.  बुंदेलखंड (Bundelkhand) परिसरातही पिण्याचे पाणी, रस्ते अशा नागरी सुविधा पुरवल्याच्या जोरावर भाजपने १९ पैकी १४ जागा राखल्यात. इथे समाजवादी पक्षाने ३ जागा पटकावल्यात. २०१७ साली भाजपने सर्वच्या सर्व १९ जागांवर विजय मिळवला होता.          

शेतकरी आंदोलकांवरील हिंसाचाराने प्रकाशझोतात आलेल्या लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) जिल्ह्यातील ८ पैकी ७ जागांवर भाजप उमेदवार निवडून आले आहेत. मध्य उत्तर प्रदेशात (Central Uttar Pradesh) भाजपने यावेळी ८२ जागांवर विजय मिळवला २०१७ च्या निवडणुकीत भाजपला ९७ जागांवर विजय मिळवता आला होता.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com